बौध्दांचा स्वतंत्र कायदा बनविण्यासाठी चांदूर रेल्वेत अभ्यास बैठक

0
765
Google search engine
Google search engine

 

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

ऑल इंडिया अ‍ॅक्शन कमिटी फॉर बुध्दीष्ट लॉ,चांदूर रेल्वे यांच्या वतीने स्थानिक विश्रामगृहात
शिलधन रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली व सुभेदार जगन्नाथ गवई यांच्या मार्गदर्शनात बौध्दांचा
स्वतंत्र कायदा बनविण्यात यावा याकरीता अभ्यास बैठक संपन्न झाली.

बुध्दगया (बिहार) महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी अनेक पुज्यनिय भन्ते कडून महाबोधी
महाविहार मुक्तीसाठी लढा उभारण्यात आला. ह्याच लढ्याच्या प्रेरणेने घटनेचे अभ्यासक
अ‍ॅड.मुवूंâद खैरे यांनी विहार मुक्ती संबधी कायदेशिर अभ्यासाची महाबोधी विहार मुक्तीसाठी
संविधानिक लढ्याशिवाय पर्याय नसल्यामुळे दिल्ली येथे आंबेडकर भवन वरून ‘बौध्दांचा
स्वतंत्र कायदा व्हावा यासाठी एप्रिलमध्ये महविराट धरणा आंदोलनाची हाक दिली. त्या
अनुषंगाने पुज्यनिय भदन्त भिक्खुगणाच्या मार्गदर्शनात ऑल इंडिया अ‍ॅक्शन कमिटी फॉर
बुध्दीष्ट लॉ ’ या बॅनर खाली देशातून समस्त बौध्दांनी एकत्र येऊन सामिल व्हावे व लढा द्यावा
त्यासाठी चांदूर रेल्वे येथे अभ्यास बैठक शिलधन रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली व जगन्नाथ
गवई, ऑ.ई.अ‍ॅ.कमेटी महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रा. अशोक वानखडे, महा प्रदेश प्रवक्ता प्रा.प्रमोद
मेश्राम, जिल्हा सचिव भारत गेडाम, यांच्या मार्गदशर्नात व सुरेश खडसे, संघपाल हरणे, सुमेंद
सरदार,प्रदीप घोडेस्वार यांचे उपस्थितीत संपन्न झाली.

ाâार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत गेडाम यांनी केले तर संचालन सुरेश खडसे व आभार अशोक
बनसोड यांनी मानले.या बैठकीला भाष्कर बनसोड, गौतम वाकडे, सुधाकर बेले, विश्वास मिसाळे,
सिध्दार्थ कांबळे, बबन गणविर, सुनिल ढोकणे, अशोक बनसोड, राजेश बनसोड, लोकेश मेश्राम,
सुरेश सुखदेवे,नारायण नेवारे, किरण हेरोडे, डी.खोब्रागडे उपस्थित होते.