रेल्वेसाठी संपादित झालेल्या जमिनीच्या  मावेजाचा प्रश्न

0
608
Google search engine
Google search engine

रेल्वेसाठी संपादित झालेल्या जमिनीच्या  मावेजाचा प्रश्न

ना. पंकजाताई मुंडे यांच्या मध्यस्थीने रेल्वे मंत्र्यानी खा. डॉ. प्रितमताई मुंडेंना सोमवारी बोलावले दिल्लीत

बीड :
नितीन ढाकणे
दिपक गित्ते

दि. ०१——– परळी – बीड – नगर रेल्वे मार्गासाठी संपादित झालेल्या जमिनीला बाजार भावाप्रमाणे मावेजा मिळावा यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी शेतकऱ्याच्या बाजुने केलेल्या मध्यस्थीनंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना सोमवारी ( दि. 2 एप्रिल ) दिल्लीत भेटीसाठी बोलावले आहे. दरम्यान शेतकऱ्याचे शिष्टमंडळ घेऊन खा. प्रितमताई मुंडे दिल्लीला जाणार आहेत.

परळी – बीड – नगर या रेल्वे मार्गासाठी बीड, वडवणी व अन्य तालुक्यातील दोन ते अडीच हजार शेतकर्‍यांनी जमिनी दिल्या असून त्यांना पूर्वीच्या केंद्र सरकारने अल्प दराने मावेजा दिला आहे. वास्तविक या भागातील जमिनी संपादित करण्याअगोदर या भागात प्रति एकर जादा दराने खरेदी खत झालेले आहे. तसेच या रेल्वे मार्गासाठी बीड शहराजवळील संपादित झालेल्या जमिनीला देखील जास्त मावेजा मिळाला आहे. असे असताना जिल्हयातील शेतक-यांनी नवीन भूसंपादन कायद्या प्रमाणे मावेजा मिळावा यासाठी रेल्वे भूसंपादन मावेजा कृती समितीच्या शिष्टमंडळाने ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांची नुकतीच भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली होती. ना. पंकजाताई मुंडे यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी लातुर येथे झालेल्या भेटीत सविस्तर चर्चा केली. त्यांनी केलेल्या मध्यस्थीने रेल्वे मंत्र्यानी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना तोडगा काढण्यासाठी दिल्ली भेटीचे निमंत्रण दिले आहे. येत्या सोमवारी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांचे एक शिष्टमंडळ रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार आहे. या भेटीत मावेजाच्या प्रश्नाबरोबरच परळीतील रेल्वे प्रवाशांच्या मागण्याविषयी देखील सविस्तर चर्चा होणार आहे.