बस दरीत कोसळली, २६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

0
639
Google search engine
Google search engine

शिमला:-

हिमाचल प्रदेशमध्ये शाळेची बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात २६ शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. कांगडा जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला. अपघातात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. हिमाचल प्रदेशचे शिक्षणमंत्री सूरज भारद्वाज यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

एनडीआरएफची टीम घटनस्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी शाळेची ही बस शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी घरी सोडण्यासाठी जात होती. नूरपूर-मलकवालजवळ बस पलटल्यानंतर १५० फूट दरीत कोसळली. बसमध्ये नर्सरीपासून पाचवी पर्यंतचे एकूण ६०हून अधिक विद्यार्थी होते. मृत मुलांचे वय १० वर्षापेक्षा कमी आहेत.