वॉटर कॅप स्पर्धेला मोर्शी-वरुड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद – आ.डॉ.अनिल बोंडे यांनी केले मोरचुंद येथे श्रमदान

0
834
Google search engine
Google search engine

वरुड : महाराष्ट्रात कित्तीतरी जिल्ह्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा चालू आहे त्यामध्ये वरुड तालुका दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा स्पर्धेत सहभागी झाला आहे, आपल्या तालुक्याला ड्रायझोन मुक्तीसाठी भरपूर गावाने यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून गाव दुष्काळ मुक्त करण्याचा विळाच आ.डॉ.अनिल बोंडे यांनी उचलेला आहे .

रविवार रोजी मोरचुंद येथे श्रमदान करण्यासाठी मोर्शी वरुड मतदार संघाचे आ.डॉ.अनिल बोंडे यांनी हजेरी लावली, व गावकऱ्यांसोबत त्यांनी श्रमदान केक. यावेळी आ.डॉ.अनिल बोंडे यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली, व त्यावर अमल-बजावणी करण्यास सुद्धा सांगितले, आपल्या गावात पावसाचा थेंब हा थांबलाच पाहिजे, व तो कसा थांबवायचा याचा विचार आपण केला पाहिजेच. शासनाच्या ज्या कुठल्या योजना मला मिळवून देता येईल त्यासाठी मी प्रयत्नरत असेल असे आवाहन आ.डॉ.अनिल बोंडे यांनी उपस्थितांना केले. यावेळी गावच्या सरपंचा, नायब तहसीलदार, जेष्ठ नागरिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.