भारतीय कबड्डी संघात निवड झालेल्या भामरागडच्या 2 मुलींचा पालकमंत्र्यांनी केला सत्कार

0
761
Google search engine
Google search engine

भामरागड / गडचिरोली :-

भामरागड येतील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात 10 व्या वर्गात शिकणाऱ्या 2 आदिवासी मुली सिंधू कुरसामी व जयश्री वड्डे यांची कॅनडा येते होणाऱ्या आंतराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी संघात नुकतीच निवड झाली होती.

त्यामुळे काल अहेरी येथें आयोजित भाजपा अहेरी तालुका बुथ प्रमुखाच्या बैठकीत आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते ह्या दोन मुलींचा शाल, श्रीफळ, ट्रॅक सूट व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला, तसेच समोर सर्व प्रकारची मदत करण्याची ग्वाही पालकमंत्री साहेबांनी ह्यावेळी दिली, तसेच त्या मुलींचे पालक, कस्तुरबा बालिका विद्यालय भामरागड च्या मुख्याध्यापिका मुडपल्लीवार मॅडम व क्रीडा शिक्षिका यांच्याही ह्यावेळी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला