*IPL सट्टा चालवणाऱ्यांना  शहर पोलीसांचा दणका -आरोपींसह मुद्देमाल जप्त*

0
754
Google search engine
Google search engine

अकोट (विशेष प्रतिनिधि)-

शहरातील गवलीपुरा भागात IPL T 20 क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा सुरू असल्याची माहिती अकोट शहर चे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना मिळाली. त्यांनी ही माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक विजयकांत सागर व प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी गावित ह्यांना देऊन त्यांची लेखी परवानगी प्राप्त करून त्यांचे मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोलिस उपनिरीक्षक शिंदे, व पोलिस कर्मचारी, उमा, घायल, उमेश सोळंके,मिसाळ, राठी,पठाण,विजय सोळंके ह्या पोलिस पथकासह गवलीपुरा येथील नितीन मेंढे ह्यांचे राहते घरी पंचासह रेड केली असता IPL T 20 च्या चेन्नई सुपर किंग व रॉयल चॅलेंज बंगलोर ह्यांचे मध्ये

सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याचे निदर्शनास आल्या वरून घटनास्थळावरून, 3 मोबाईल किंमत 14500, LG कंपनीचा LCD TV, किंमत24000, सेट टॉप बॉक्स किंमत1500, वाय फाय बॉक्स किंमत1000,calculeter किंमत 150, असा एकूण 41150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नितीन मेंढे, निलेश मेंढे ह्यांना ताब्यात घेतले.या प्रकरणी राञी उशीरापर्यंत कारवाई सुरु होती. पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन शेळके करीत आहेत