चांदूर रेल्वेत क्रिकेट उन्हाळी शिबीराचे थाटात उद्घाटन संपन्न – संत गजानन क्रिकेट अॅकॅडमीचे आयोजन

0
886
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे- (शहेजाद खान ) 

     उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, क्रीडाकौशल्याला वाव देण्यासाठी शहरातील संत गजानन क्रिकेट अॅकॅडमी व्दारा प्रथमच उन्हाळी क्रिकेट शिबिर भरविण्यास सुरुवात केली आहे. या शिबीराचे उद्घाटन नुकतेच थाटात संपन्न झाले.

       स्थानिक जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणावर नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले. तर प्रमुख पाहुने म्हणुन जि.प. हायस्कुलचे प्राचार्य अशोक इंगळे, नगरसेवक गोटु गायकवाड, महेश कलावटे, विनय कडु आदींची यावेळी उपस्थिती होती. सदर शिबीर २५ मेपर्यंत दररोज सकाळी ६.३० ते ९ व सायंकाळी ५ ते ७ यावेळात  सुरू आहे. या शिबीरामध्ये अनेक ७ वर्षावरील मुले, मुलींनी सहभागी घेतला आहे. या शिबीरामध्ये तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात खेळाडुंना टर्फ गवताच्या पिचवर खेळविल्या जात असून गेस्ट प्रशिक्षणाच्या स्वरूपात रणजी संघाचे प्रशिक्षक शिबीरात प्रशिक्षण देणार आहे. तसेच खेडाळुंना प्रमाणपत्र, मेडल व क्रिकेट ड्रेस अॅकॅडमीकडून देण्यात असून बाहेरगावच्या खेळाडूंसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
शिबीरामध्ये खेडाळुंना बी.सी.सी. लेवल बी. कोच संदिप गावंडे व विद्यापीठ संघ प्रशिक्षक डॉ. विनोद कपिले प्रशिक्षण देत आहे. शिबीराच्या यशस्वीतेकरीता अमर मोरे, नंदुभाऊ सोरगिवकर, आशिष ताथोडे आदी अथक परिश्रम घेत आहे.