अ.भा. ग्रामिण पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी श्री प्रविण शर्मा तर सचिवपदी श्री मोटवानी

0
787
Google search engine
Google search engine
उपाध्यक्षपदी तिवारी, गोटफोडे, सहसचिवपदी इरफान पठान तर कोषाध्यक्षपदी घटारेंची वर्णी
चांदूर रेल्वे – शहेजाद खान –
           विविध प्रश्नावर लेखणीद्वारे आवाज उठवणे, सामाजिक कार्याला प्रसिद्धी देऊन योग्य न्याय देण्याचे काम पत्रकार अखंडितपणे करत असतात. जनतेचा आणि लोकशाहीमधील दुवा म्हणून पत्रकारांकडे बघितले जात आहे. याच पत्रकारांची चांदूर रेल्वे तालुका कार्यकारीणी नुकतीच गठीत करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्षपदी गुड्डु उर्फ प्रविण शर्मा यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी अभिजीत तिवारी, विनय गोटफोटे, सचिवपदी संजय मोटवानी, सहसचिवपदी इरफान पठान, कोषाध्यक्षपदी अमर घटारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
         अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने हे होते तर विशेष अतिथी म्हणुन केंद्रीय कार्याध्यक्ष मधूसुधन कुलथे, सुरेश सवळे , अशोक पवार , कैलासबापू देशमुख, वसंतराव कुलकर्णी, अशोक राठी, राजेन्द्र भूरे, उत्तम ब्राम्हणवाडे, युसुफ खान, पवन बैस, अशोक याऊल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मधूसुधन कुलथे यांनी चांदूर रेल्वे तालुका कार्यकारीणीची घोषणा केली. यामध्ये चांदूर रेल्वे तालुकाध्यक्षपदी गुड्डु उर्फ प्रविण शर्मा यांची फेरनिवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अभिजीत तिवारी, विनय गोटफोटे, सचिवपदी संजय मोटवानी, सहसचिवपदी इरफान पठान, कोषाध्यक्षपदी अमर घटारे यांची वर्णी लागली. तसेच सदस्यांमध्ये प्रभाकरराव भगोले, उत्तमराव गावंडे, युसुफ खान, बाळासाहेब सोरगिवकर, प्रा. रविंद्र मेंढे, अमोल गवळी, मंगेश बोबडे, विवेक राऊत, धिरज नेवारे, मनिष खुने, राजेश सराफी, शहेजाद खान यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.