अहेरी नगर पंचायत वर भाजपाची निर्विवाद सत्ता – अध्यक्ष पदी हर्षाताई ठाकरे तर उपाध्यक्ष पदी कमलताई पडगेलवार ह्यांची बहुमताने निवड.

0
772
Google search engine
Google search engine

विरोधी गटाच्या 3 नगरसेवकांचे भाजपाला मतदान

अहेरी :-
आज अहेरी नगर पंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची २.५ वर्षात होणारी निवडणूक नगर पंचायत सभागृहात पार पडली

ह्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी भाजपाच्या हर्षाताई ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चनाताई विरगोनवार यांचा 11 विरुद्ध 5 मतांनी पराभव करीत अहेरी राजनगरीच्या दुसरे नगराध्यक्ष मनुन विराजमान झाल्या, तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या कमलताई पडगेलवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शैलेश पटवर्धन यांचा 11 विरुद्ध 6 मतांनी पराभव करीत उपाध्यक्ष पदी विराजमान झाल्या..!!
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी ही राजनगरी अहेरी नगर पंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक अंत्यत प्रतिष्ठेची करीत गेल्या 2 दिवसापासून अहेरीत ठाण मांडून बसून होते व ह्या निवडणूकिची रणनिती आखत होते, आपल्या जवळच्या विश्वासु कार्यकर्त्यांनां महत्वाची जबाबदारी देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक 2 अपक्ष नगरसेवक अश्या 3 नगरसेवकांना आपल्या खेम्यात खेचून व त्यांच्या कडून भाजपाच्या उमेदवारांना मतदान करवून विरोधकांनां जोरदार झटका दिला..

निकाल जाहीर होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायत समोर व मुख्य चौकात फटाक्यांची आतिषबाजी करीत, मिटाई वाटून व नारेबाजी करून आपला आनंद व्यक्त केला, ह्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी राजमहाल अहेरी येते जावून पालकमंत्री मा.ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या आशीर्वाद घेतला ह्यावेळी राजेसाहेबांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

ह्यावेळी भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, अहेरी शहर अध्यक्ष मुकेश नामेवार, ओबीसी मोर्चा अहेरी तालुका अध्यक्ष शँकर मगडीवार, माजी नगराध्यक्ष प्राजक्ताताई पेद्दापल्लीवार, उपाध्यक्ष अन्नपूर्णा ताई सिडाम,नगरसेवक श्रीनिवास चटारे,नारायण सिडाम,मालुताई तोडसाम,रेखाताई सडमेक, स्मिताताई येमुलवार,कबीर शेख, संजय झाडे,गिरीश मद्येर्लावार, रवींद्र ठाकरे,दिलीप पडगेलवार, शेषराव दिवसे,संतोष येमुलवार, गुड्डू ठाकरे, सरफराज आलम,श्रीकांत नामनवार, राकेश गुडेल्लीवार, दिनेश येनगनटीवार, पवन गदेवार,प्रणय येगलोपवार सह अहेरी येतील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.