बारावी परीक्षेत आचल खोलापुरे चे सुयश

0
692
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान .) 

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतांना कोणतेही शिकवणीवर्ग नसतांना चांदूर रेल्वे शहरातील एका विद्यार्थीनीने परिस्थितीवर मात करीत १२ वर्गाच्या निकालात उत्तुंग भरारी घेतली आहे.
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये चांदूर रेल्वे शहरातील व अमरावती येथील केशरबाई लाहोटी महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी आचल सतिश खोलापुरे हिने बारावीच्या निकालात ९३ टक्के गुण प्राप्त केले. आचलचे वडील चांदूर रेल्वे येथील आपल्या घरी एक लहान चक्की चालवितात. याच्याच भरोश्यावर घरातील ६ लोकांचा उदरनिर्वाह चालतो. अशाही परिस्थितीत आचलने जिद्द, चिकाटी व मेहनत करीत प्राविण्य प्राप्त केले. ती आपल्या यशाचे श्रेय शिक्षकवृंद, आई-वडिलांना देते. पुढे आचलने सी.ए. होण्याची इच्छा वर्तविली आहे.