गौण खनिज उत्खनन करणारे याना राजकीय की महसूल चा पाठींबा?

Google search engine
Google search engine

सुसाट वेगाने धावताना वाहने मोठा अपघात होण्याची शक्यता

चांदुर बाजार:-
आयपीएस समीर शेख यांनी रेती तस्कर यांच्या वर कार्यवाही छडा लावल्याने अवैध रेती वाहतूक करणारे याना अल्पशा प्रमाणात आळा बसला आहे.मात्र गौण खनिज उत्खनन करणारे याच्यावर मात्र तीळ मात्रही फरक पडला नसल्याचे चित्र चांदुर बाजार तालुक्यात दिसत आहे…

मुरूम वाहतूक ची पास काढल्यानंतर त्यांना ठराविक ब्रास वाहतूक करण्याची अट त्या मध्ये असते तसेच वाहतूक कशाने करण्यात येणार आहे त्याची माहिती सुद्धा त्यामुध्ये नमूद असते.मुरूम याची वाहतूक करणारं तस्कर हे मोठ्या प्रमाणात मुरूम चे उत्खनन करता यावे या करिता.आपल्या वाहन बाजूला ठेवून किंवा नमूद वाहण्यापेक्षा मोठी क्षमता असलेल्या वाहनातून मुरूम ची वाहतूक करीत आहे.ज्या ठिकाणी ची महसूल कडून परवानगी घेतली त्या ठिकाणी महसूल विभागाच्या एकही कर्मचारी तपासणी साठी फिरत नाही.त्यामुळे आपल्या मर्जी प्रमाणे अवैध वाहतूक चांदुर बाजार मध्ये होत आहे.या सर्व गोष्टीला महसूल ची परवानगी आहे की राजकीय दबाव पोटी कार्यवाही तर सोडा मुद्दाम दुर्लक्ष तर केले जात नाही अशी चर्चा सुरू आहे.

अवैध गौण खनिज वाहतूक करणारे दिलेल्या वेळेत शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या अधिक करून वाहतूक करतात.आणि जास्त वाहतूक करता यावी यासाठी त्याचा वाहनाचा वेग अधिक असतो.त्यामुळे मोठ्या अपघात होणार नाही गे नाकारता येत नाही.त्यामुळे आता याच्या मर्जीवर लगाम लावण्यात महसूल विभाग यशस्वी ठरणार की लाखो रुपयांचा शासनाचा महसून बुडून आपला आर्थिक व्यवहार या मध्ये केला जाईल हे अजून पर्यत तरी कोडेच आहे..