खरेदी विक्री मधील ऑफलाइन नोंदणी रजिस्टर गायब,व्यवस्थापक यांची वेगवेगळी माहिती.

-चांदुर बाजार येथील खरेदी विक्री मधील शेतकरी ऑफलाईन नोंदणी चे रजिस्टर गहाळ ,व्यवस्थापक नवलकर यांनी दिली वेगळी वेगळी माहिती,
संबंधित दोषी वर पोलिसात गुन्हा दाखल करावा:-शेतकरी ची मागणी,खाजगी व्यक्तीला इतके अधिकार कसे?

चांदुर बाजार :-

चांदुर बाजार तालुक्यातील शेतकरी यांच्या अत्यंत जवळीक असनारी खरेदी विक्री संस्थेमधील ऑफलाइन नोंदणी रजिस्टर गायब झाले समोर आले आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकरी याची मोठ्या प्रमाणात झालेली नुकसान भरपाई कोण देणार अशी मागणी ची चर्चा शेतकरी वर्ग यांच्या कडून होत आहे.तर या सर्व प्रकरण याना दोषी असणाऱ्या व्यक्ती वर फौजदारी कार्यवाही व्हाही अशी मागणी शेतकरी करीत आहे. व्यवस्थापक पेक्षा खाजगी व्यक्तीला अधिकार जास्त असल्याचे यावेळी खरेदी विक्री मधील चित्र दिसून आले.

अजून पर्यँत तूर नोंदणी केल्याचे कोणत्याच प्रकारचे फोन,आणि एसएमएस न आल्याने तालुक्यातील शेतकरी यांनी खरेदी विक्री मध्ये धाव घेतली.आणि आपला नोंदनि क्रमांक विचारला असता त्या ठिकाणी खाजगी रित्या काम करणाऱ्या व्यक्ती मंगेश अटालकर यांनी माहिती चा अधिकार टाकून माहिती विचार असे सांगितले.त्यामुळे शेतकरी यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात रोष दिसून आला.त्यांनी ऑफलाईन नोंदणी रजिस्टर विचारले असता ते रजिस्टर त्या ठिकाणावरून गायब असल्याचे दिसून आले.मग शेतकरी या प्रकरणात घोळ वाटल्याने त्यांनी चांदुर बाजार तहसीलदार आणि सहायक निबंधक यांच्या कडे तक्रार केली.या तक्रार मुळे अनेक रहस्य समोर आले.

तक्रारी ची दखल घेत नायब तहसीलदार विजय गोहाड आणि सहायक निबंधक राजेश भुयारयांनी खरेदी विक्री मध्ये शेतकरी यांच्या सोबत धाव घेतली.याची चौकशी केली असता या ठिकाणी कोणत्याच प्रकारची ऑफलाईन नोंदणी रजिस्ट्र नाही असे व्यवस्थापक यांनी लिहून दिले.याची गंभीर दखल घेत निबंधक यांनी खरेदी विक्री अध्यक्ष याना तात्काळ खुलासा मागितला मात्र त्यांनी अजून पर्यंत खुलासा दिला नाही.त्यामुळे शेतकरी प्रति खरेदी विक्री प्रशासन निष्काळजीपणा दाखवत असल्याचे दिसत आहे

चांदुर बाजार तालुक्यात एकूण अंदाजित 6000 वर ऑनलाइन नोंदणी झाली तर 2000 वर शेतकरी यांची मोजणी झाली.मात्र या 2000 शेतकरी मध्ये खरेदी विक्री मधील कर्मचारी यांनी आर्थिक व्यवहार करून आपल्या जवळच्या अधिक लाभ दिला असल्याचा शेतकरी यांचा रोष आहे. नावे खाली वर करून ऑनलाइन नोंदनी करून व्यापारी याना अधिक लाभ दिल्याचे दिसत आहे.

*या प्रकरण संबधी व्यवस्थपक यांच्या दोन वेगवेगळ्या माहिती सांगितल्याने प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपावर दिसत आहे. तर या प्रकरणी खरेदी विक्री संस्था अध्यक्ष यांच्या सोबत संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.तसेच शेतकरी याना माहितीचा अधिकार करा सांगणाऱ्या खाजगी व्यक्ती वर कार्यवाही करा.आणि रजिस्टर गायब केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्याची मागणी जोर धरत आहे.तर या सर्व प्रकरणामुळे शेतकरी यांचे झालेली नुकसान भरपाई त्या व्यक्ती कडून घेतल्या जातील का अशा प्रश्न सध्या तरी उभा आहे.*

“नोंदणी क्रमांक अजून पर्यंत आला नाही याची विचारणा केली असता या ठिकाणी काम करणाऱ्या खाजगी व्यक्ती यांनी माहिती चा अधिकार टाकून माहिती मागा असल्याचे सांगितले.तसेच या ठिकाणी ऑफलाइन रजिस्टर नसल्याचे दिसून आले त्यामुळे या प्रकरणात हजारो किंटल पोत्याची अफरातफर असल्याचे दिसून येत आहे.या मध्ये दोषी वर कार्यवाही झालीच पाहिजे.”
प्रदीप बंड शेतकरी
*———//////————————*
चांदुर बाजार खरेदी विक्री मध्ये हा जो प्रकार झाला आहे अत्यंत गंभीर असून या प्रकार ज्या शेतकरी यांनी उघडा केला त्याचे मी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या मिटिंग मध्ये या वर कार्यवाही करण्यासाठी आपण सर्व संचालक आवाज उठवू.आणि संबंधित दोषी वर नक्की कार्यवाही करणार.
संजय गुजर संचालक खरेदी विक्री संस्था चांदुर बाजार

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।