अहेरी आगारातील संप करणाऱ्या S.T. कर्मचाऱ्यांशी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केली चर्चा..

0
735
Google search engine
Google search engine

अहेरी :-

S.T.अहेरी आगारातील कर्मचाऱ्यांनी वेतन वाढीसह विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाला गेल्या 2 दिवसापासून सुरुवात केली होती, त्यामुळे अहेरी आगारातील 100% बस फेऱ्या रद्द झाल्या होत्या ह्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोय होत होती, ह्याची माहिती मिळताच गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी काल अहेरी आगारात भेट देऊन संप करणाऱ्या S.T. कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

ह्यावेळी बोलतांना ते म्हणाले आपल्या मागण्या अगदी रास्त आहेत त्यामुळे मी तुमच्या पाठीशी आहे,आपण लवकरच ह्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व परिवहन मंत्री दिवाकरजी रावते यांच्याशी बोलून आपल्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी ह्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिले, ह्यावेळी उपस्थित S.T. चालक, वाहक तसेच इतर जवळपास 200 कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला..!!
ह्यावेळी अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षाताई ठाकरे, उपाध्यक्ष कमलताई पडगेलवार, भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, भाजपा अहेरी शहर अध्यक्ष मुकेश नामेवार,ओबीसी मोर्चा अहेरी तालुका अध्यक्ष शँकर मगडीवार, पप्पू मद्दीवार सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..!!