अखेर अकोट-खंडवा’ रेल्वे मार्गाच्या ब्रॉड गेज मार्गास हीरवा कंदील ,उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय वनविभागाकडून मंजुरी

0
2325
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके :-

काल दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अकोट-खंडवा रेल्वे मार्गाच्या मीटर गेजवरुन ब्रॉड गेज रुपांतरास ‘वन संवर्धन कायद्याची’ परवानगी मिळाली आहे.त्यामुळं अकोट- अकोला ब्रॉडगेज पाठोपाठ अकोट – खंडवा या मार्गाच्या गेज परीवर्तनाच्या कामाला देखील सुरवात होणार आहे.जयपुर ते हैद्राबाद (सिकंदराबाद) मार्गावरील अकोला ते खंडवा एवढाच टप्पा रखडलेला होता .आता हा टप्पा पुर्ण होणार असल्याने या रेल्वे मार्गाने नऊ राज्य जोडली जाणार आहेत.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत परिवहन भवन येथे रेल्वेमंत्री पियुष गोयल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, केंद्रीयवने व पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी व अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत‘अकोट-खंडवा’ रेल्वे मार्गाच्या गेज रुपांतरणातील अडचणी दूर करण्याबाबत बैठक झाली. या बैठकीत वन विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या ‘अकोट- खंडवा’ रेल्वे मार्गाच्या गेज रुपांतरणासाठी ‘वन सवंर्धन कायद्यानुसार’ परवानगी देण्याचा निर्णय झाला .

वन सवंर्धन कायदा १९८० अस्तित्वात येण्यापूर्वीच ‘अकोट-खंडवा’ हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आल्याने या कायद्यातून या रेल्वे मार्गाला वगळण्यात आले आहे व गेज रुपांतरणास मंजुरी देण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचे विश्वसनिय सुञांच्या वतीने कळते आहे. या मंजुरीमुळे वन संवर्धन कायद्याअंतर्गत परवानगी न मिळाल्याने बंद पडलेल्या‘अकोट ते आमला खुर्द’ या गेज रुपांतरणाच्या कामाला मंजुरी मिळाली असल्याचेही लवकरच या मार्गावरील गेज रुपांतरणाच्या कामास सुरुवात होणार असल्याचेही कळते आहे.

अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज रुपांतरास सुरुवात झाली असून सध्या अकोला-अकोट मार्गाच्या गेज रुपांतरणाचे काम सुरु आहे. मात्र, पुढे अकोट ते खंडवा मार्गावरील ‘अकोट ते आमला खुर्द’ हा भाग अमरावती व अकोला जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने या मार्गाच्या गेज रुपांतरणासाठी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक होती. ही मंजुरी न मिळाल्याने अकोट ते आमला खुर्द हे गेज परिवर्तनाचे काम रखडले होते,

संदर्भ :- maharashtradgipr वृत्त संकेतस्थळ