लोकचळवळीतून चांदूर स्वच्छ , सुंदर शहर बनेल-मुख्याधिकारी मिलिंद दारोकार

0
837
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे स्वच्छ महाराष्ट्र अभियान बाबत पत्रकार परिषद
कॅरी बॅगचा वापरा टाळा व घनकचरा वेगवेगळे करून देण्याचे केले आवाहन

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

नगर परिषद प्रशासन व नागरिक यांच्या सयुंक्त लोकचळवळीतून स्वच्छ, सुंदर व हरित चांदूर
रेल्वे शहर बनेल असे प्रतिपादन चांदूर रेल्वेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांनी स्थानिक
नगर परिषद कार्यालय सभागृह येथे ‘ स्वच्छ महाराष्ट्र अभियान ‘ अंतर्गत आयोजित पत्रकार
परिषद केले.
या पत्रकार परिषदेला चांदूर रेल्वे नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुने,
मुख्याधिकारी मिलिंद दारोकार उपस्थित होते. यावेळी पूढे बोलतांना मुख्याधिकारी दारोकार
म्हणाले की, दुकानदार व नागरिकांनी दुकान, घर, फ्लॅट व मॉल मधील घनकचरा आवारात
सुका व ओला कचरा असे वेग वेगळे विलनीकरन करून घन कचरा गाडीत टाकायचा आहे.
कचरा उघड्यावर टाकणाऱ्यावर मुंबई पोलीस अधिनियम तरतुदी व पर्यावरण संरक्षण १९८६
व घनकचरा व्यवस्थापन हाताळणी नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. तसेच नागरिक
व दुकानदारांनी प्लॉस्टीक पिशवी वापर करू नका व कोणाकडे प्लास्टिक बॅग आढळल्यास
५०० ते ५ हजार रूपयापर्यंत दंडात्मक कार्यवाही होऊ शकते. त्यामूळे नागरिकांनी वस्तु
आणण्यासाठी कापडी पिशवी किवा व्हर्जिन प्लॉस्टीक पासून बनविलेल्या कॅरीबॅग  वापराव्या असे

आवाहन मुख्याधिकारी यांनी केले. नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी यांनी स्वच्छ चांदूर, सुंदर चांदूर शहर

करण्यासाठी शहरातील शाळा व कॉलेजमधून विद्याथ्र्यांचे प्रबोधन करण्यात

येणार आहे. चांदूर स्वच्छ, हरित व सुंदर बनविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे
आवाहन नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी यांनी केले. दुकानाची स्वच्छता केल्यावर दुकानदार
घनकचरा तिथेच नालीत टाकतात. त्यामूळे नाली चोकअप होते. त्यामूळे अशी कृती करणाNया
दुकानदारावर दंडात्मक कारवाई करा व शहरात मुख्य चौकात सीसीटिव्ही कॅमेरा बसवून
त्यांच्यावर लक्ष ठेवा अशी सुचना यावेळी मांडली. या पत्रकार परिषदेला नगरसेवक गोटु
गायकवाड, सतपाल वरठे, नगरसेविका स्वाती मेटे, शारदा मेश्राम, स्वाती माकोडे, कल्पना
लांजेवार, शुभांगी वानरे, न.प.कर्मचारी नितीन इमले, जितेंद्र कर्से उपस्थित होते.