अकोट शहर पोलिस स्टेशन मध्ये साजरा झाला योग दिवस .

0
849
Google search engine
Google search engine

आकोटःपोलिसांना रात्रंदिवस समाजाच्या सुरक्षे साठी धावपळ करावी लागते, समाज सुरक्षित ठेवत असतांना त्यांचे आरोग्य मात्र असुरक्षित राहते, झोपेचे आणि जेवणाचे कुठले वेळापत्रक नसल्याने व्यायाम करण्या साठी वेळ भेटत नाही आणि भेटला तरी व्यायाम करण्याची, योगासन करण्याची आवड नसल्याने व्यायाम होत नाही, ह्या सगळ्या बाबीचा परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर होतो, पोलिसा मध्ये व्यायाम व योगासनांची आवड निर्माण व्हावी व आरोग्य चांगले रहावे ह्या साठी जागतिक योग दिवसाचे अनुषंगाने योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, ह्या साठी आर्ट ऑफ लिविंग चे अकोट चे समन्वयक गणेश टेमझरे ह्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना योगाचे धडे दिले, सदर कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक गजानन शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, तसेच बहुसंख्येने पोलिस कर्मचारी हजर होते।