रस्त्यावर सापडलेले पैसे पोलिसांना देऊन विद्यार्थ्यांनीने दाखवला प्रामाणीकपणा

0
977
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके – आज च्या कलियुगात प्रामाणीक पणा अभावानेच दिसून येतो, प्रत्येक व्यक्ती पैश्याच्या मागे धावतांना दिसतो, पैश्या साठी आपल्या जन्मदात्यांना पण यमसदनी पाठविण्यास आजची पिढी मागे पुढे पाहत नाही, माञ अश्या परीस्थीतही आजही प्रामाणीकपणा जीवंत असल्याचे उदाहरण अकोट शहर पोलीसांसह शहरवासियांना पहायला मिळाले.अशीच एक घटना अकोट शहरात घडली ,नम्रता अनिरुध्द गनभोज रा, अकोलखेड ता.अकोट ही मुलगी स्थानिक लेट दिवाली बेन सेदानी हायस्कुल, अकोट येथील वर्ग 10 मध्ये शिकणारी विद्यार्थिनी 10 वीची परीक्षा देऊन 88 % मिळवून पास झाल्यानंतर अकोट येथील पांडे ह्यांचे MHCIT क्लास मध्ये कोर्स करण्या साठी मैत्रिणी सोबत दररोज अकोलखेड ते अकोट येणे जाणे करीत होती. काही दिवसा पूर्वी क्लास ला जात असताना माहेश्वरी मंगल कार्यालया समोर तीला रस्त्यावर पैसे पडलेले दिसले, तिने व तिच्या सोबत असलेल्या साक्षी रामचंद्र आहुजा ह्या मुलीने ते मोजून पाहिले असता ते 700 रुपये भरले, परंतु ह्या मुलींनी त्यांच्येवर झालेल्या संस्काराला जागून सदर पैसे सरळ पोलिस स्टेशन अकोट शहर येथे जमा केले.ही बाब पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे कानावर जाताच त्यांनी सदर मुलीचा शोध घेऊन तिच्या प्रामाणिक पणाला सलाम करून आज पोलिस स्टेशन अकोट शहर येथे तिचा तिच्या आईचा , भाऊ व गावातील प्रतिष्ठित नागरिक ह्यांचे समोर पुष्पगुच्छ व नगदी ईनाम देऊन गौरव केला, नम्रता सारखा प्रामाणिक पणा प्रत्येक व्यक्ती ने दाखवावा हा सकारात्मक संदेश समाजा मध्ये जावा म्हणून नम्रता चा सत्कार केल्याचे ह्या वेळी पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले, व कु नम्रता ला, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या घटनेने शहर पोलिसांवर जनेतेचा दृढ झालेला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखीत झाला .