त्या आगीत दीड लाखांचे साहित्य खाक – अतिक्रमणामुळे अग्नीशमन दलाची गाडी लावण्यास झाला विलंब

0
692
Google search engine
Google search engine
विज वितरण कार्यालयातील जळालेल्या वस्तु हटविल्या
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    चांदूर रेल्वे येथिल ढोले कॉम्प्लेक्स मधील विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागीय उपकार्यकारी अभियंता कार्यालयाला सोमवारी रात्री ८.५५ वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मंगळवारी सकाळी कार्यालयातील आढाव्यानंतर अंदाजे दीड लाखांचे संगणकाचे साहित्य, फर्निचर व रेकॉर्ड जळाल्याचा अंदाज आहे. मंगळवारी दिवसभर जळालेल्या वस्तू हटविण्याचे काम सुरू होते.
     आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी सोमवारी रात्री ९.३० वाजता दाखल झाली. त्यावेळी अग्निशमन दलाची गाडी लावण्यासाठी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणाने विलंब झाला. रस्त्यावरील वाढलेले अतिक्रमणाकडे नगरपरिषद प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करीत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो, अशा भावना नागरिकांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.