युवाराष्ट्र ने बांधली योगीता अन माधवच्या सुखी संसाराची रेशीमगाठ

0
1096
Google search engine
Google search engine

अकोला/संतोष विणके- घरात ऐन तारुण्यात मुलाने केलेली आत्महत्या,त्यात मुलीचे लग्न अन आप्तस्वकीयांनी दिलेलें वचन न पाळल्याने हतबल झालेला बाप…हतबल अन नाजुक परीस्थीतीने निराश असणारे वडील श्रीकृष्ण मोरखेडे या मुलीच्या बापाची व्यथा युवाराष्ट्रने समाजासमोर मांडली.अन माणुसकीच्या मदतीचा धो धो पाऊस पडला.अन नुसताच पडलाच नाही तर सारसावलेले मदतीचे हात आज कामी आले अन सर्वांच्या साक्षीने योगीताचा विवाह पार पडला.अन एक शेतकरी कुटुंब अन बाप नैराश्य अन संकटांच्या फेऱ्यात जाण्यापासुन वाचलं.योगीताच्या या सुखी संसाराची वेली फुलविण्यासाठी , संतोष दादा खुमकर, रवी दादा खवले,रवी भाऊ मूर्तडकर,सागर भाऊ रामेकर,नंदू भाऊ बढे,मनोहर भाऊ खाडे, पुरुषोत्तम पाटील मांगटे, सागर भाऊ नाकट,बाजाजजी यांनी तर वस्तू रुपात मनीष ताथोड,विलास भाऊ ताथोड,व नरेंद्र देशपांडे यांनी हातभार लावला.योगीताचा संसार फुलला, बापाचं मन हलकं झालं, सोबत झालेल्या गळा भेटीत त्यांच्या डोळ्यातून तरळणारे अश्रू आपल्या सर्वांच्या वाटेवरील फुले ठरू देत हीच निसर्ग चरणी प्रार्थना अशी भावना या मंगल सोहळ्यासाठी झटणाऱ्यां धनंजय मिश्रा व युवाराष्ट्र संघटना व मिञ मंडळींनी व्यक्त केली.