चांदुर बाजार खरेदी विक्री प्रकरण अजून पर्यंत गुलदस्यत ,तहसीलदार यांचा अहवाल वरिष्ठ कडे पाठविला.

0
1414
Google search engine
Google search engine

सहायक निबंधक यांची कार्यवाही करायला टाळाटाळ, खरेदी विक्री संचाकल यांच्यावर होणार का गुन्हे दाखल?

चांदुर बाजार / शशिकांत निचत-

शेतकरी यांच्या तूर खरेदी चे सर्व व्यवहार नाफेड अंतर्गत स्थानिक पातळीवर असणाऱ्या खरेदी विक्री संस्था याना देण्यात आले.मात्र या खरेदी विक्री संस्था यांनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून आपल्या जवळीक लोकांना अधिक लाभ दिल्या असल्याचे चित्र चांदुर बाजार तालुक्यात निर्माण झाले होते.यात आणखी भर जेव्हा पडला त्यावेळी खरेदी विक्री संस्था यांनी शेतकरी तूर खरेदी विक्री चे ऑफलाईन रजिस्ट्रार विचारले.तेव्हा या ठिकाणी संचालक मंडळ आणि व्यवस्थापक यांनी वेगवेगळी माहिती दिली.

सुरुवातीला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन रजिस्ट्रार नसल्याचे व्यवस्थापक यांनी लिखित स्वरूपात माहिती दिली.तर एकीकडे संचाकल मंडळ यांनी रजिस्टर दिसत नसल्याचे सांगितले,यातच व्यवस्थापक यांनी रजिस्टर असल्याचे पुन्हा सांगितल्याने प्रकरण आणकीच वळणदार ठरले.खरेदी विक्री संस्था या ठिकाणी काम करणारी रोजदारी कर्मचारी याने ते रजिस्टर तब्बल 8 दिवसापर्यंत बाहेर काडलेच नाही.त्यामुळे यात मोठा घोळ आणि शेतकरी यांचे नुकसान झाल्याचे दिसून येते.त्याची भरपाई कोण देणार? हा प्रश्न उदभवत आहे.

शेतकरी यांच्या तूर खरेदी च्या वेळी ऑनलाइन नोंदणी आवश्यक होती एका दिवशी अधिक जास्त अर्ज येत असल्याने खरेदी विक्री संस्था चांदुर बाजार यांनी रोजदारी म्हणून ठेवले कर्मचारी आलेल्या अर्जप्रमाणे ऑफलाईन रजिस्टर मध्ये नोंद करीत होते.मात्र या ठिकाणी आपल्या जवळीक याना अगोदर लाभ आणि बाकीच्यांना नंतर असे चित्र शेतकरी यांच्या तक्रार वरून दिसून आले.खरेदी विक्री मधील रोजदारी कर्मचारी या अफरातफर कोणाच्या सांगण्यावरून करत आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

अमरावती जिल्ह्यात भातकुली, अमरावती,परतवाडा सारखा खरेदी विक्री संस्था च्या असाच कार्यभार होता.त्या ठिकाणी संचाकल यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात आले तर या ठिकाणी गुन्हे का दाखल करण्यात येऊ नये अशी चर्चा रंगली आहे तर सहायक निबंधक चांदुर बाजार यांची भूमिका या ठिकाणी संशयास्पद दिसून येत आहे.फक्त कार्यवाही च्या नावावर प्रकरण शांत करून शेतकरी यांच्या नुकसान भरपाई ची जबाबदारी सहायक निबंधक यांच्या कडून फेटाळून लावली जात असल्याचे दिसत आहे.

या सर्व प्रकारच्या चौकशी तहसीलदार यांच्या देखरेखीखाली नायब तहसीलदार यांनी करून तसा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविला मात्र अजून पर्यंत कोणतीच कार्यवाही न झाल्याने प्रकरण शेतकरी यांचा खरेदी विक्री,सहायक निबंधक यांच्या प्रति रोष व्यक्त होत आहे.आणि तशी चर्चा पण आता तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी शेतकरी वर्ग यांच्या मध्ये सुरू आहे.

आम्ही खरेदी विक्री संस्था मधील झालेल्या अफरातफर आणि गैरव्यवहार ची पूर्णतः चौकशी केली.चौकशी मध्ये जे सत्य आढळून आले त्या बाबत चा तसा अहवाल आम्ही वरिष्ठांना पाठविला आहे.

तहसीलदार शिल्पा बोबडे चांदुर बाजार