मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेता येणार – बंदी नसल्याचे राज्य सरकारने केले स्पष्ट – विरोध करणाऱ्यांवर कारवाई होणार

0
1113
Google search engine
Google search engine

नागपूर/ पावसाळी अधिवेशन :

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. जर मल्टिप्लेक्स बाहेरील खाद्यपदार्थांवर बंदी घालत असेल, तर त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असं राज्य सरकारने विधीमंडळात आज स्पष्ट केलं आहे.