सचिन कापरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे, पियुसीचे वाटप

0
1040
Google search engine
Google search engine

 

अनिल चौधरी, पुणे

पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती जपणारा आणि आपल्या जीवनात अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करत उज्ज्वल यश संपादन केले तरी त्याने हुरळून न जाता गोरगरिबांच्या जीवनात आनंद फुलविण्यात, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदात आपला आनंद पाहणारा कोंढवा खुर्द गावातील युवक व शिवसेना शाखाप्रमुख सचिन कापरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत दगडूशेठ पिताश्री आश्रमात वयोवृद्ध-जेष्ठ नागरिक  व लहान मुलांना फळे वाटप आणि मनपा शाळेसमोर वाहनांचे पियुसीचे वाटप करण्यात आले.

कर्तृव, दातृत्व याच्या जोडीला अथक परिश्रम आणि इतरांना मदत करण्याच्या भूमिकेतून वावरणाऱ्या सचिन कापरे यांनी कोंढवा गावाच्या राजकारण व समाजकारणात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे.सर्वसामान्य जनता, तरुणवर्ग यांच्याशी असलेली जवळीक आणि सर्वसामान्यांच्या हिताची बांधिलकी स्वीकारून कार्यरत असलेल्या सचिन कापरे यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे. प्रचंड आत्मविश्वास आणि सर्वांचे हित जपण्याच्या भावनेतून प्रामुख्याने बेरोजगार तरुणांना रोजगार आणि उद्याग व्यवसायाची संधी प्राप्त करुन देण्यासाठी ते कार्यमग्न असतात, असे मा.नगरसेवक भरत चौधरी यांनी वाढदिवसानिमित शुभेच्छा देताना म्हणाले.

यावेळी मा.नगरसेवक भरत चौधरी, तानाजी लोणकर, लक्ष्मण लोणकर, प्रशांत लोणकर, संतोष गोरड, भोलानाथ, सागर लोणकर, राजेंद्र बाबर, निलेश महिंद्रकर, अजीज शेख, भरत शेंडकर, दीपक कापरे, ज्ञानेश्वर भोईटे, अमोल लोणकर आदी उपस्थित होते.