दुकान फोडीतील आरोपी अखेर चांदुर बाजार पोलिसांच्या जाळ्यात

0
1069
Google search engine
Google search engine

आश्रय एजन्सी मधील चोरी प्रकरणातील आरोपी 4 तासात जेरबंद
अजय आकरे यांच्या टीम ची कार्यवाही,चोरी गेलेले साहित्य जप्त

चांदुर बाजार:–/क्राइम रिपोटर

स्थानिक चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आश्रय एजन्सी मनोहर डहाके यांच्या दुकान मध्ये चोरी झाल्याची तक्रार त्यांनी दिनांक 11 जुलै ला चांदुर बाजार पोलीस स्टेशन येथे दिली.तक्रार दाखल होताच चांदुर बाजार पोलीस स्टेशन चे पोलीस कॉस्टबल पंकज फाटे,नितीन डोगरे मोहीन यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
या मध्ये पोलिसांनी गुप्त माहिती च्या आधारे आरोपी विशाल ढोके याला अटक करणयात आले.त्याच्या ताब्यातून 4 LCD टीव्ही मुद्देमाल किम्मत 50000/रू जप्त करणयात आला.आणि त्याच्यावर कलम 380,461 भादंवि दाखल करण्यात आले आहे. तसेच एक LCD टीव्ही अद्यापही मिळाला नाही.पुढील तपास ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.