अकोट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रीया अडचणींबाबत मनविसेचा पुढाकार

0
1014
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके – औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रीया सुरु झाली असुन विद्यार्थ्यांनच्या प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या विवीध कागदोपत्री अडचणी निर्माण होत असल्याचे कळताच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी याबाबत पुढाकार घेतला.मनविसने प्राचार्य श्री. खुळे सर यांची भेट घेतली.यावेळी मनविसे पदाधीकारींनी प्राचार्यांना विद्यार्थ्यांच्या कागद पञांविषयी समस्या निर्माण होत असेल त्या आम्हाला कळवा आम्ही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू अशी चर्चा केली तसेच नविन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे तरी वसतिगृह मध्ये विद्यार्थ्यांना राहणं योग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या अशी मागणी केली.विशेष म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही शेतमजुर शेतकऱ्यांच्या गरीब मुलांना तांञीक शिक्षण देणाऱ्या इंजिनियरींग कॉलेज पेक्षा कमी नाही.त्यामुळं गरीब घरातील या मुलांना वस्तीगृहासह ईतर सुविधा मिळाव्यात म्हणुन मनविसे सातत्याने विद्यार्थी हीताच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी पाठपुरावा करते आहे.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरज वर्मा, शहर अध्यक्ष शशांक कासवे, शहर उपाध्यक्ष शुभम देशपांडे, शहर उपाध्यक्ष अक्षय पंत,तेजस लेंघे, प्रतीक तेलगोटे,अजय शर्मा,दीपक नहाटे, निखील टिकले, आशुतोष पोहरकर,अजय राऊत व कार्यकर्ते उपस्थित होते.