सोमवार खेडा इथून गावठी दारू विक्री करणारे याना अटक, दुय्यम ठाणेदार सुबोध वंजारी यांच्या टीम ची कार्यवाही, 1 आरोपी याना अटक 1 आरोपी फरार

0
846
Google search engine
Google search engine

सोमवार खेडा इथून गावठी दारू विक्री करणारे याना अटक,
दुय्यम ठाणेदार सुबोध वंजारी यांच्या टीम ची कार्यवाही, 1 आरोपी याना अटक 1 आरोपी फरार.

चांदुर बाजार:-

शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सोमवार खेड्या मधून शिरजगाव कसबा पोलिसांनी दोन आरोपी याना गावठी दारू ची विक्री करताना अटक केली असून त्याच्या वर मुबंई दारूबंदी कायदा 65(ड) अंतर्गत कार्यवाही करण्यात आली.
या कार्यवाही दरम्यान आरोपी चंदू देविदास तामभाखे वय 35 वर्ष.रा. कौनिपुर शिरजगाव कसबा हा फरार असून, राजू सुदामा परिसे वय 32 वर्ष रा.सोमवार खेडा शिरजगाव कसबा याना अटक करण्यात आली तर त्यांच्या कडून 23 लिटर गावठी दारू अंदाजित किंमत 5750 रुपये जप्त करण्यात आली.
ही कार्यवाही ठाणेदार मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुबोध वंजारी,पोलिस कॉस्टबल अंकुश अरबत,राहुल खर्चन यांनी केली.