‘श्रीं’ चा पुण्यतिथी सोहळा

0
1280
Google search engine
Google search engine

शेगांव:- श्री संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव 14 सप्टेंबर रोजी येथे भाविकांच्या मांदियाळीत साजरा झाला. राज्यभरातून आलेल्या शेकडो दिंड्यांच्या उपस्थितीत अश्व आणि गजा सह शहरातून पालखी मिरवणुक काढण्यात आली.  शेगांव येथे श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी सोहळय़ाला श्री गणेश याग व वरुण यागाने प्रारंभ झाला. या सोहळ्य़ातील मुख्य पुण्यतिथी कार्यक्रम १४ सप्टेंबर रोजी पार पडले. या मधे सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान झाले. यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय संचालक नीलकंठ पाटील यांच्या हस्ते दु.२ वाजता श्रींच्या रजत मुखवट्याचे  पूजन झाल्यानंत श्रींची पालखी रथ, मेणा, गज अश्‍वासह नगर परिक्रमेसाठी निघाली.  श्री गजानन महाराज मंदिरातून ढोलपुरी गेट, श्री गजानन चित्र मंदिर, जुने महादेव मंदिर, शीतलनाथ महाराज धर्मशाळा, माळीपुरा, प्रगटस्थळ येथे श्रीची प्रगटस्थळी पूजा व त्यानंतर. गढीजवळून डॉ. तायडे यांचा दवाखाना, बाजार रोडने बसस्टँड, शिवाजी चौक, गांधी चौक, नंतर प्रमुख पालखी मार्ग भास्करराव संगराव देशमुख मार्ग (RD 18) येथून श्रींच्या मंदिरात संध्याकाळी दाखल झाल्यानंतर.यावेळी संस्थानच्या वतीने श्रींची आरती ने सांगता करण्यात य़ेईल
श्री गजानन मंदिरात दर्शनासाठी एकेरी मार्गाची व्यवस्था केली आहे. दर्शन लवकर व्हावे यासाठी श्रींच्या भक्तांना श्रींचे कळसदर्शन, मुख्य दर्शन व समाधी दर्शन घेता येणार आहे. भक्तांच्या सेवेसाठी कर्मचारी, सेवाधारी वर्ग तत्पर होते. हा सोहळा अनुभवण्यासाठी राज्यातून लाखांवर भाविक शेगावांत दाखल झालेले आहेत. विदर्भातील सर्वांत मोठा उत्सव असल्याने शासकीय यंत्रणांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. तर  पोलिसांचा कडा पहारा शेगावी दिसून येत आहे. उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.