आकोटात पाच हजार चिमुकल्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश

0
884
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणकेस्वच्छता ही सेवा अंतर्गत भव्य जनजागरण रॕलीस्वच्छ महाराष्ट्र अभियानातील स्वच्छ ही सेवा पंधरवाड्यांतर्गत स्वच्छता जाणिव जागृती रॕली मध्ये पाच हजारावर चिमुकल्या बालकांनी *चलो !स्वच्छताकी रोशनीमें हम सब नहायेंगे*अशी आर्त हाक देत स्वच्छतेच्या संदेश दिला आणि स्वच्छतेकडे नगरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.या आगळ्या वेगळ्या रॕलीतील स्वच्छतेच्या घोषणांनी अवघी नगरी दुमदुमून गेली होती.आकोट नगरपरिषदे द्वारा *स्वच्छता ही सेवा* पंधरवाड्या अंतर्गत भव्य जनजागरण रॕलीचे आयोजन करण्यात आले होते या रॕलीत नगरपरिषद व खाजगी शाळांतील पाचहजारावर विद्यार्थी व शिक्षकवृंदांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश जनमानसा पर्यंत पोहोचविला. रॕलीतील नगरपरिषद शाळांचा सहभाग नाविन्यपूर्ण व उत्फूर्त होता.थोर महापुरुषांचे वेशभूषेत संदेश देत या चिमुकल्यांनी शहरवासींयांचे लक्ष वेधून घेतले होते.म.गांधी,गाडगे बाबा,राजमाता जिजाई,सावित्रीबाई फुले, फातिमाबी,डाॕ बाबासाहेब आंबेडकर,पंडीत नेहरु,भूतपूर्व राष्ट्रपती ए.पी.जे.अ.कलाम,टीपू सुलतान,इंदिरा गांधी.पंतप्रधान नरेंद्र मोदी,तथा नगराध्यक्ष हरिनारायन माकोडेअशा विविध महापुरुषांसह लोक संस्कृती दर्शक वेशभूषेत स्वच्छ भारत घडविण्यासाठी या बालकांनी आर्त हाक दिली.तर न.प. मुक्तांगण विद्या मंदीराचे मुलींनी पथनाट्य सादर केले.सर्वप्रथम नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे ,उपाध्यक्ष अबरार खाँ,मुख्यअधिकारी प्रशांत रोडे,आरोग्य सभापती मायाताई धुळे ,नगरसेवक शशिकला गायगोले,बाळासाहेब घावट,यांनी महात्मा गांधी व संत गाडगे बाबा यांचे प्रतिमेचे पुजन करुन रॕलीला हिरवी झेंडी दाखविली.या रॕलीत श्री शिवाजी हायस्कुल व श्रीमती लक्ष्मीबाई गणगगे विद्यालयाने छात्रसेना व स्काऊट गाईड पथकांसह विशेष सहभाग घेतला.स्काऊट मास्टर विजय जिचकर व निलेश झाडे यांचे सहकार्य लाभले.दरम्यान शिक्षण प्रशासन अधिकारी नंदकिशोर हिंगणकर यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अभियंता रोशन कुमरे ,आरोग्य निरिक्षक चंदन चंडालिया व सर्फराज खान,विधी विभाग प्रमुख निखिल गुजर व न.प.कर्मचारी उपस्थित होते.शेवटी सशिअ शहर समन्वयक रितेश निलेवार यांनी सर्वांचे आभार मानले.नगरपरिषद शाळांचे मुख्याध्यापक सुनिल तरोडे,अंबादास लाघे,मुक्त्यार शहा,सुधाकर पिंजरकर,अफजल हुसेन,अ.आरिफ,सुनिल वडाळ,सुधीर कांबे राजेंद्र लांडे,आसिफ शहा, जहिरुद्दीन जनाब,शाहिस्ता अंजुम, मन्साराम खोटे शिक्षण लिपिक रघुनाथ बेराड व सर्व न प शिक्षक यांनी रॕलीचे आयोजनात परिश्रम घेतले.