लाटेत आलेल्या भाजपा सरकारने देशाची, राज्याची वाट लावली – धनंजय मुंडे

0
724
Google search engine
Google search engine

दि. 1 ऑक्टोबरचा विजयी संकल्प मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन
आष्टी / पाटोदा दि.19…………… सन 2014 च्या लाटेमध्ये सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने चार वर्षात देशाची आणि राज्याची वाट लावली आहे. त्यांची जनता आता 2019 मध्ये वाट लावणार असून, त्याचाच संकल्प करण्यासाठी दि.01 ऑक्टोबर रोजी बीड येथे होणारा विजयी संकल्प मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यंानी केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत बीड मध्ये 1 ऑक्टोबर रोजी होणार्‍या विजयी संकल्प मेळाव्याच्या तयारीसाठी पाटोदा, आष्टी येथे आयोजित तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, माजी. अमरसिंह पंडीत, जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, जि. प. सदस्य बाळासाहेब अजबे, सतिष शिंदे, महेंद्र गर्जे, आप्पा राख, विठ्ठल सानप यांच्यासहर दोन्हीही तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

तर व्याजासह परतफेड करू धसांना इशारा
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याची व्याजासह परतफेड करू असा इशारा देतानाच नव्याने आमदार झालेल्यांनी परळी पेक्षा आष्टी आणि पाटोद्यातील प्रश्‍नांची चिंता करावी असा टोला सुरेश यांचे नाव घेता लगावला.

शेतकर्‍यांची बिकट परिस्थिती- पंडित
आज जिल्ह्यातील शेतकर्‍यांसमोर दुष्काळासह शासनाचे विविध थकलेले अनुदान, कर्जमाफी, पिकविमा असे अनेक प्रश्‍न आहेत. या प्रश्‍नांबाबत सरकारला या मेळाव्यातुन जाब विचारणार असल्याचे माजी आ. अमरसिंह पंडित यांनी सांगितले. केंद्र आणि राज्यातील शासनाच्या विविध कशा फसव्या आहेत आणि हे सरकार कसे फसवे आहे. याचा पर्दाफाश माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके यांनी केला. आष्टी पाटोद्याचा आमचा उमेदवार कोण याची चिंता करण्यापेक्षा बीडच्या पालकमंत्र्यांचा आष्टी, पाटोदा, बीडचा उमेदवार कोण हे जाहीर सांगण्याची हिंमत दाखवावी असे आव्हान अमरसिंह पंडित यांनी दिले. आष्टी तालुक्यातील एकाही शेतकर्‍याचा ऊस शिल्लक राहणार नाही याची ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेस घेईल असे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यंानी सांगितले. बाळासाहेब अजबे, सतिष शिंदे, महेंद्र गर्जे, आप्पा राख यांनीही भाजपच्या नविन झालेल्या आमदारांनी मतदार संघाची कशी वाट लावली आहे याचा पाढा वाचला. दोन्ही ठिकाणच्या मेळाव्याच कार्यकर्त्यांची अलोट गर्दी झाली होती. रात्री उशिरा शिरूर येथेही कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.