*माहुली जहागीर येथील ग्रामपंचायत  सरपंच व सदस्य ACB च्या जाळ्यात – ग्रा.पं सदस्यांनी स्वीकारली 24 हजाराची लाच*

3192

अमरावती :-

संजय नारायणराव नागोने(सरपंच) माहुली जहागीर यांनी तक्रारदारास ( बांधकाम ठेकेदार ) पडताळणी दरम्यान नाली बांधकामाची एम बी इंजिनिअर कडुन करून देणे तसेच रस्ता बांधकामाचे उर्वरित पैसे देणेकरिता यापूर्वी दिलेल्या चार लाखाचे सहा टक्क्याप्रमाणे 24000/- रु लाचेची मागणी करुन लाच रक्कम ग्रा पं सदस्य आलोसे यांचेजवळ देण्यास सांगितली याच वेळी ACB ने सापळा रचून कारवाई केली प्रफुल सुधाकरराव भेलकर, वय 38,ग्रा पं सदस्य,माहुली जंहागिर ता जिल्हा अमरावती या ग्रामपंचायत सदस्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन लाच रक्कम जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर करण्यात येत आहे

सदरची कारवाई पोलिस निरीक्षक राजवंत आठवले, सहा.पोउपनि.कैलास सानप,पोहवा श्रीकृष्ण तालन, नापोकॉ.प्रमोद धानोरकर, पोशी पंकज बोरसे, पोशी.युवराज राठोड, पोना. अकबर यांनी केली

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।