अकोट शहर पोलिसांच्या उत्तम रहदारी नियोजनाने दरवर्षीच्या दिवाळीतील ट्राफीक जाम मधुन शहरवासियांची सुटका

0
993
Google search engine
Google search engine

पहिल्यांदाच दिवाळीत तीन चाकी व चार चाकी वाहनांना मुख्य मार्गावर प्रवेश बंद

आकोट/संतोष विणके

आकोट शहरात दरवर्षी दिवाळीच्या पर्वावर जवाहर रोड वर खरेदी साठी ग्राहकांनी गर्दी केल्याने ट्राफिक जाम चा सामना सामान्य जनतेला करावा लागत होता, परंतु ह्या वर्षी अकोट शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे योग्य नियोजना मुळे दिवाळी सुरू होऊन दोन दिवस झाले तरी कोणत्याही ट्राफिक जाम चा फटका सामान्य नागरिकांना बसला नाही, कारण ह्या वर्षी पहिल्यांदाच शिवाजी चौका पासून सुरू होणाऱ्या जवाहर रोड चा प्रवेश बॅरिकेट लावून तीन चाकी व चार चाकी वाहना साठी बंद करण्यात आला, फक्त मोटारसायकल लाच प्रवेश देण्यात आला,

तसेच सोनू चौका कडून शिवाजी चौका कडे येणाऱ्या तीन चाकी व चार चाकी वाहना साठी प्रवेश बंद करण्यात आला, परंतु अंजनगाव कडून येणाऱ्या चार चाकी वाहना साठी नरसिंग रोड खुला ठेवण्यात आला, अशीच वयवस्था सोनू चौक ते जयस्तंभ चौक दरम्यान करण्यात आली दोन्ही बाजूने बॅरिकेट लावून तीन चाकी व चार चाकी वाहना साठी वाहतूक बंद करण्यात आली, वाहतूक बंद ठेवण्याची वेळ ही सकाळी 10 ते रात्री 10 वाजे पर्यंत ठेवण्यात आली, त्यामुळे सामान्य जनतेची ट्राफिक जाम मधून सुटका झाली, प्रत्येक बॅरिकेट वर, चोर व पाकीट मारा पासून सावध राहण्याच्या व सावधानते च्या सूचना लिहलेली बॅनर्स लावण्यात आली आहे.

दिवसभर पोलिस स्टेशन अकोट शहर चे अधिकारी ,कर्मचारी कडक गस्त करतांना दिसत आहेत, ह्या साठी पोलिस निरीक्षक गजानन शेळके, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गवई, आशिष शिंदे, मुंढे, तसेच ट्राफिक कर्मचारी, ठाकूर, लापूरकर, फोकमारे , मिसाळ हे मेहनत घेत आहेत, अकोट शहर पोलिसांच्या ह्या अभिनव नियोजना मुळे व्यापारी व सामान्य जनता अकोट शहर पोलिसांना धन्यवाद देतांना दिसत आहे.