नवीन वर्षात गाव पाणीदार करण्याचा संकल्प करून आपले गाव जलसमृद्ध करावे — श्रीकांत उंबरकर उप विभागीय अधिकारी  नरखेड येथे  पाणी फाउंडेशन ची भव्य प्रदर्शनी व कार्यशाळा संपन्न  ! 

0
1822
Google search engine
Google search engine
नवीन वर्षात गाव पाणीदार करण्याचा संकल्प करून आपले गाव जलसमृद्ध करावे — श्रीकांत उंबरकर उप विभागीय अधिकारी
नरखेड येथे पाणी फाउंडेशन ची भव्य प्रदर्शनी व कार्यशाळा संपन्न !
नरखेड तालुक्याची वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून होणार दुष्काळमुक्तीकडे वाटचाल !
शेकडो महिलांनी केली प्रदर्शनीची पाहणी ! विशेष प्रतिनिधी /
नरखेड तालुक्यामध्ये पाणी फाउंडेशन च्या वतीने पंचायत समिती नरखेड येथे पाणी फाऊंडेशन च्या प्रत्यक्ष प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ३१ डीसेंबर ला सत्यमेव जयते वॉटर कप ४ स्पर्धेच्या निमित्ताने या भव्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनीचे उद्घाटन उप विभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर , जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोनेकर , जिल्हा परिषद सभापती उकेश चव्हाण , पं. स. सभापती राजू हरणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार शेखर पुनसे , गट विकास अधिकारी दयाराम राठोड , पं. स. सदस्य मूलताईकर , नगर परिषद मुख्याधिकारी माधुरी मडावी , संघमित्रा ढोके , तालुका कृषी अधिकारी आटे , भूत साहेब , पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक भूषण कडू , तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , भूषण सूर्यवंशी , जय सोनूले , वैशाली खंडाते , रुपाली गडलिंग , स्वाती गायकवाड यांच्यासह आदी विभागाचे मान्यवर उपस्थित होते .
गावाच्या विकासात पाणलोट उपचारांची नेमकी काय भूमिका आहे ? हे गावकऱ्यांना समजण्यासाठी बनवण्यात आलेले खास मॉडेल्स तालुक्यांमध्ये लागणाऱ्या प्रदर्शनांमध्ये लावण्यात आले आहेत. प्रदर्शनात मांडलेले हे छोटे मॉडेल्स् काय सांगत आहेत? श्रमदान करण्यासाठी गाव कसे एकत्र येते आणि या जलसंधारणा च्या स्पर्धेत सहभागी गावाना कामाच्या माध्यमातून पाण्याचे बक्षीस कसे प्रत्येकांना मिळते हि प्रदर्शन पहिल्या नंतर हे प्रत्येक गावकऱ्यांना कळते , विशेष अश्या प्रदर्शनाचे आयोजन पाणी फाउंडेशन च्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा उप विभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर मार्गदर्शन करतांना म्हणाले की नवीन वर्षात प्रत्येकाने आपले गाव पाणीदार करण्याचा संकल्प करून प्रत्येकाने गाव वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी करून पाणीदार करावे व असे मत व्यक्त केले , पंचायत समिती सभापती राजू हरणे कार्यशाळेत मनोगत व्यक्त करतांना सत्यमेव जयते वॉटर कप ४ मध्ये आपल्या तालुक्यातील सर्वच ग्राम पंचायतीनी सहभागी होऊन आपली गावे पाणीदार करावीत, त्यासाठी प्रशासन स्तरावरून आवश्यक ती संपुर्ण मदत करण्याचे आश्वासन यावेळी यांनी केले.
यावेळी शिक्षण सभापती उकेश चव्हाण म्हणाले की, जलसंधारण क्षेत्रात पाणी फाउंडेशनचे काम उल्लेखनीय आहे. लोकसहभागातून अनेक गावे पाणीदार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा २०१८ या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत प्रत्येक ग्रामपंचायतीस कशाप्रकारे उतरता येईल व कोणत्या प्रकारची कामे करता येतील, याचे नियोजन कार्यशाळेत करण्यात आले होते.
यावेळी गावकरी , अधिकारी कर्मचारी यांनी दुष्काळ निवारणाच्या दृष्टीने सर्वतोपरी सहकार्य करण्याची हमी दिली , या कार्यक्रमाचे प्रास्तविक पाणी फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक भूषण कडू यांनी केले .या वेळी प्रदर्शनी ला तालुक्यातील सरपंच, उप सरपंच , ग्रामसेवक , अंगणवाडी सेविका , पोलीस पाटील , ग्राम पंचायत सदस्य , गावकरी , पत्रकार , वन विभाग , रोजगार सेवक , जलमित्र , जल दूत यांनी प्रदर्शनी पाहण्यासाठी अलोट गर्दी केली. तेव्हा सदर प्रदर्शनी ही ३१ डिसेंबर व १ जानेवारीला सुद्धा सुरू राहील . त्यामुळे तालुक्यातील जास्तीस जास्त गावातील सरपंच , शेतकरी , स्वयंसेवी संस्था, रोजगार सेवक, विविध विभागाच्या कर्मचारी ,शाळेचे विद्यार्थी पर्यावरण प्रेमी यांनी उपस्थित राहून पाणलोट विकास चा प्रदर्शनाचा प्रत्यक्ष दर्शन घेऊन गाव पाणीदार करण्यासाठी या चळवळीमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान पाणी फाउंडेशन टीम तर्फे करण्यात आले.