सामाजिक सदभावासह आरोग्यासाठी धावलेत आकोटवासी

534

वार फाऊंडेशनच्या वाँक् ए थाँन ला प्रचंड प्रतिसाद

बालकांपासून वयोवृद्धांसह हजारो शहरवासीयांचा सहभाग

आकोट/संतोष विणके

वाॕर फाऊंडेशन व ओझोन मल्टीस्पेशालिटी हाॕस्पीटल अकोला यांचे संयुक्त विद्यमाने वाॕक ए थाॕन आरोग्य रॕलीत समाजमन जागवित बालकांपासून वयोवृद्धांसह हजारो आकोट शहरवासीयांनी धाव घेत एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहरवासीयांनी मोठ्या संख्येत सहभागी होवून या उपक्रमाला उत्फूर्त प्रतिसाद दिला.

६ जानेवारीला सकाळी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्रांगण धावपटू च्या उपस्थितीने फुलून गेले होते.
या दौडीत मुली व महिलांनी उलेखनिय सहभाग घेत धाव घेतली. समाज मन जागविणा-या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केल्या जात आहे.

या उपक्रमास नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे उपविभागीयअधिकारी उदय राजपूत,श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॕड.गजानन पुंडकर,आकोटचे ठाणेदार
संतोष महल्ले ग्रामिण पो स्टे ठाणेदार मिलिंद बाहकरअकोल्याचे डाॕ.पराग टापरे, डाॕ विनित हिंगणकर पालिकेचे मुख्यअधिकारी प्रशांत रोडे, प्रशासन अधिकारी नंदकिशोर हिंगणकर ,डाॕ गि-हे,दादाराव येवतकार,माया म्हैसणै,आनंद भोरे,जेसिजचे अध्यक्ष निलेश हाडोळे,प्रा.गजानन निमकर्डे,दिलिप हरणे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.

सर्वप्रथम छत्रपती शिवराय व शिक्षण महर्षि डाँ भाऊसाहेब देशमुख यांचे पुतळ्याचे पुजन व जिजाऊ माँ साहेब ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमांना हारार्पण व दिप प्रज्वलन अतिथींच्या हस्ते होवून या अभिनव उपक्रमाचा प्रारंभ झाला

एकता दौडी मध्ये ६ ते १५, १६ ते ३५, ३६ते ७५ अशा तीन गटात सहभागी झालेल्या स्पर्धक महिला पुरुषांना अतिथींनी हिरवी झेंडी दाखविली. शिवाजी काँलेज-शनवारा,यात्रा चौक,नरसिंग रोड ,सोनू चौक,जवाहर रोड,याकुब पटेल चौक यात्राचौक परत त्याच मार्गे शिवाजी काँलेज धावपटूंनी धाव घेत सामाजिक आरोग्य,एकात्मता ,पर्यावरण संरक्षण ,स्वच्छ भारत,व लेक वाचवा या ज्वलंत प्रश्नावर सर्वाचे लक्ष वेधून घेतले या निमित्ताने समाज मन जागं झाल्याचं चित्र दिसून आलं

या निमित्ताने आयोजित वेशभूषा,व संदेश फलक पोस्टर्स अशा विविध स्पर्धा मध्ये शाले विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्पर्धेतील चिमुकल्यांचानी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.स्पर्धेचे परिक्षण प्रा.गजानन निमकर्डे व दिलिप हरणे यांनी केले*

आरोग्य संवर्धन दौड मध्ये शहरातील विविध संस्था ।स्वयंसेवी व सामाजिक संघटना युवक -युवती मंडळे,महिला मंडळ व व्यायाम शाळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले ग्रामिण रुग्णालय व ओझोन हास्पीटल द्वारा अँम्बुलन्स व वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आले होते.शिवसेना जिल्हा उपप्रमुख दिलिप बोचेडाॕ राजेश नागमते ,संजय शेळके यांनी देखील अँम्बुलन्स उपलब्ध करुन दिली.श्री शिवाजी महाविद्यालयाचे विशेष सहकार्य लाभले.

अकोल्याच्या ओझोन मल्टी स्पेशालीटी हाँस्पीटल च्या वैद्यकीय पथकाने सेवा करीत १०९ वयोवृद्ध रुग्णाची तपासणी करुन सेवा प्रदान केली आंतर राष्ट्रीय मँराँथाँन पटू डाँ विनित हिंगणकर यांचे प्रेरणेने वाक् थाँन गृप गठीत झाला आहे हे विशेष

आकोटचे दिव्यांग युवक धिरज कळसाईत यांनी कळसाबाई शिखर गाठले त्यांच्या साहस,जिद्द व आत्मविश्वासाप्रती त्यास विशेष गौरविण्यात आले.डाॕ विनित हिंगणकर यांनी भरीव आर्थिक व शैक्षणिक मदत करण्याचे यावेळी जाहीर करुन संवेदना प्रगट केली.

कँप्टन डाँ प्रा प्रशांत कोठे यांचे मार्गदर्शनाखाली श्री शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रिय सेवा योजनेचेविद्यार्थी तथा आय टी आय चे प्रा गजानन भांबुरकर व विद्यार्थ्यानी या भव्य आयोजनात महत्वाची भूमिका पार पाडली. स्काऊट गाइडचे विद्यार्थ्यांचा व आकोट जेसीस गृपचा सहभाग होता।आकोट पो स्टे चे पोलिस कर्मचा-यांनी वाहतुक व्यवस्थापन व बंदोबस्त चोख सांभाळला

वाॕर फाऊंडेशनच्या माध्यमातून विधायक व रचनात्मक कार्य
करणा-या महिलांच्या गृपद्वारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले -राजमाता जिजाऊ जन्मोत्सव पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.या गृपने सजगता दाखवित गत तीन वर्षा पासून सद्भाव दौड आयोजन करुन जनजागरणाची अभिनव भुमिका पार पाडली आहे. या कार्याची विशेष दखल घेत अतिथींनी संयोजकांचे विशेष कौतुक केले.समाजातील सर्व घटकांशी आपुलकीचं नातं जोपासून सामाजिक जाणिवांचा आगळा वेगळा अनुभव दिला त्यानिमित्ताने वाॕर गृप धन्यवादास पात्र ठरल्याची प्रतिक्रिया शहरात उमटली.

समारोप व बक्षिस वितरण
————————-
सामाजिक एकता दौड मध्ये प्रथम, द्वितीय,व तृतिय क्रमांकाचे विजेत्यांना यांचे हस्ते प्रमाणपत्र ,गौरव चिन्ह व बक्षीस देवून गौरविण्यात आले.

१०-१५ वयोगटात (मुले) पुर्वेश नाथे,यश निर्वाण व राकेश चांगळ, अनुक्रमे प्रथम ,द्वितिय व तृतिय क्रमांक पटकाविला।
तर मुलींच्या गटात कु कविता धर्मे,श्वेता पाटील,वैष्णवी मानकर यांनी अनुक्रमे प्रथम ,द्वितिय व तृतिय क्रमांक प्राप्त केला.

१६ ते ३५ या गटात युवकांमधून आदेश इंगळे,हर्षल अवचार व ऋषीकेश हिरोळे यांनी तर युवतीमध्ये छाया वानखडे,राखी पटेल व कोमल साबळे यांनी अनुक्रमे प्रथम ,द्वितिय व तृतिय क्रमांकाने शर्यत जिंकली

३६ ते ७५ या गटात पुरुषांमध्ये हर्षल मानकर प्रथम,विजय तेलगोटे द्वितीय तर व प्रशांत रंधे यांनी तृतिय क्रमांक तर महिला गटात सुरेखा इंगोले, अंकीता कुलट व सुनिता कोमटकार या धावपटूंनी शर्यत जिंकून बहुमान मिळविला आहे.स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना मेडल देवून प्रोत्साहीत करण्यात आले.

*एकता दौड स्पर्धेतील धावपटूंना कृष्णा स्पोर्टस्,किडस् झी चे अक्षय ठोकळ,प्रा.नवनीत लखोटिया,कान्ट्रक्टर एस बी. आग्रवाल,टारगेट अॕकेडमीचे वर्मा सर,आहिर झेराॕक्स, बक्षिसांसाठी योगदान देवून धावपटूंचा यथोचित सन्मान करण्यात आला.*

*या दौडीत जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. यांचा विशेष गौरव करुन आदर व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी उपस्थितांनी टाळ्यांचा जोरदार कळकळाट करु त्यांना प्रणाम केला.*

*वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थीनी स्वरा महेंद्र राऊत या चिमुकलीने वेशभूषेत प्रथम क्रमांक पटकावून हॕट्रिक साधली.*

याप्रसंगी
कु.अश्विनी फोकमारे,निशा ढोक,कु.निशा भारसाकडे,अविनाश धुर्वे,विवेक डोहळे,शुभम् राऊत, या विविध क्षेत्रातील नैपुण्य प्राप्त करणा-या गुणवंतांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सुंदर संचालन सविता भांबुरकर व अॕड संतोष खवले यांनी तर आभार प्रदर्शन प्रिती मासोदकर यांनी केले

एकता दौड यशस्वी करण्यासाठी वाॕर फाऊंडेशन आकोटच्या भैरवी हिंगणकर , माधवी सोनखासकर, प्रिती मासोदकर, प्रा स्वाती वैद्य-कोठे,अर्चना काळे, मंजुषा टेमझरे,विद्या लांडे, माधवी मोहोकार,प्रा.अर्चना मानकर ,अश्विनी फोकमारे ,रजनी धनभर,रंजना दिंडोकार,सविता भांबुरकर,अर्चना हिंगणकर आदींनी खुप परिश्रम घेतले.
———————————————

अकोट शहरवासीयांचा प्रतिसादाने बळ मिळाले
-भैरवी हिंगणकर

आकोट शहरात तिस-या वर्षी ओझोन हाॕस्पीटलच्या सहकार्यात वाॕक् ए थाँन आयोजीत करुन आरोग्य संवर्धन,बेटी बचाव ,पर्यावरण संरक्षण ,स्वच्छता, शेतकरी आत्महत्या या सारख्या ज्वलंत प्रश्नांकडे जनमानसाचे लक्ष वेधण्याचा आमचा हेतू यशस्वी झाला. यावर्षी आकोट शहरातील विविध संस्थांनी या उपक्रमात सहभागी होवून हा उपक्रम व्यापक केला.सामाजिक सद् भाव व आरोग्य विषयक सजगता निर्माण व्हावी या हेतू एक थीम घेवून दौड घेतली .या उपक्रमास समाजातील सर्व घटकांनी प्रचंड प्रतिसाद देवून सहकार्य केलेले आहे
विविध संस्था संघटना शाळा माहाविद्यालयाच्या गुरुजनांनी आम्हास पाठबळ दिले.अशी प्रतिक्रीया वाॕर फाऊंडेशनच्या च्या संयोजिका सौ भैरवी हिंगणकर यांनी व्यक्त केली प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणा-या सर्वांचे विशेषतः आकोट शहर पोलिस प्रशासनाचे त्यांनी आभार मानले,
———————————————

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।