आकोट तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन

173

दर्पणकारांना पत्रकार संघाची मानवंदना

आकोट/प्रतीनीधी

मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य कै.बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य त्यांना अभिवादन करुन तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

स्थानिक अकोला मार्गावरील पुर्वा कॉम्प्लेक्स येथे आकोट तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिओम व्यास हे होते. तर जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किर्तीकुमार वर्मा, सचिव विजय शिंदे, तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक दीपक देव, माजी अध्यक्ष रामदास काळे, कार्याध्यक्ष कमलकिशोर भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

तद्नंतर किर्तीकुमार वर्मा यांनी जांभेकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्याच प्रमाणे विजय शिंदे, रामदास काळे, कमलकिशोर भगत, हरिदास चेडे आदींनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला किरण भडंग, बाप्पु नागळे, वामन जकाते, रमेश तेलगोटे, लक्ष्मीकांत व्यास, लकी इंगळे, संतोष विणके, विनोद कोनप्ते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन तालुका पत्रकार संघाचे सचिव मंगेश लोणकर यांनी केले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।