दर दशमीला स्वछता मोहीम राबवणाऱ्या गाडगे बाबांच्या लेकींचा लोकजागर मंचने केला सन्मान

311

आकोट/प्रतीनीधी

हीवरखेड जवळील सौंदळा (ता.तेल्हारा) येथे शिव महिला मंडळाच्या सव्वीस महिला या नियमीतपणे दर दशमीला स्वच्छता मोहीम राबवतात.ग्रामसुधार अन ग्रामस्वच्छता मोहीम राबवणाऱ्या गाडगेबाबांच्या विचाराने अविरत कार्य करणाऱ्या या लेकींचा लोकजागरने अनोखा सन्मान केला. कृष्णाबाई शेवाने, प्रेमीलाबाई मेतकर,प्रेमीलाबाई पांडे,अपुरणाबाई डाखोरे,विमलबाई काकड,सुमित्राबाई कोकाटे,मनकर्णा कोकाटे,गिरीजा कोकाटे,सुशीला कोकाटे,कमला मार्के,प्रेमीला राहाणे, मनोरमा ढोकणे,निर्मला शित्रे, केसर शित्रे,रत्ना काटे,सरस्वती शित्रे, नर्मदा मेतकर,नलू मेतकर,वेणूताई गावंडे,चंद्रकला मनतकार,शांता ढोकणे,मनकर्णा चेनेकर,सुमन ठाकरे,आशा मानकर,चंदा मार्के,राधा दोरकर या २६ महिला गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्येक दशमीला महिन्यातून दोनदा पूर्ण गाव स्वच्छ करतात.

या स्वछतादूत महिलांचा साडी-चोळी, ग्लोव्हस, मास्क व झाडू देऊन अनिलदादा गावंडे यांच्या मार्गदर्शनात लोकजागर मंचच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.पं.स.उपसभापती सौ.कल्पनाताई अरबट होत्या तर अतिथी म्हणून सरपंच सौ.अनिता ताई सपकाळ व श्री देवी संस्थानचे अध्यक्ष नवलकुमार अरबट उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली या वेळी लोकजागर मंचचे जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार,अनंतराव सपकाळ, सौ कल्पनाताई अरबट यांची समायोचित भाषणे झालीत.

यावेळी पोलिस पाटील तेजराव शित्रे,ग्रा.प.सदस्य राजेंद्र जुम्बळे, हरिणारायन शेवाने,संतोष गावंडे ,तेल्हारा तालुका अध्यक्ष संदीप गावंडे,पत्रकार दिनेश लोहाना,योगेश जायले,अमित डोबाळे, आनंद रोडे पाटील, मुजाहिद खान, इ. मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरिभाऊ भिसे,दत्ता खोट्टे,ज्ञानेश्वर मेतकर,रामचंद्र शित्रे,तुकाराम शित्रे यांनी प्रयत्न केले .कार्यक्रमाचे संचालन राजेश टाले यांनी तर प्रास्ताविक व आभार महेंद्र कराळे यांनी केले.असे लोकजागरच्या वतीने कळवण्यात आले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।