सौ आर्चनाताई पाटिल यांच्या हस्ते कोंड येथे ५ कोटी ८५ लाखाच्या कामाचे उदघाटन

367

सौ आर्चनाताई पाटिल यांच्या हस्ते कोंड येथे ५ कोटी ८५ लाखाच्या कामाचे उदघाटन

उस्मानाबाद / प्रतिनिधी – उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील विवीध कामांचे उदघाटन जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ आर्चनाताई पाटिल यांच्या हस्ते थाटात करण्यात आले. हा कार्यक्रम ता ८/१/२०१९ ( मंगळवारी) कोंड येथे पार पडला यात सुरवातीला पशु वैद्यकीय कामाचे भुमीपूजन करण्यात आले .व येथीलच भव्य अशी कोंड येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारतिचे सौ आर्चनाताई पाटिल यांच्या हस्ते नारळ फोडून हि इमारत हस्तांतरीत करण्यात आली आहे. तसेच रस्ता ,अंगणवाडी ,या कामांचे भुमिपूजन करण्यात आले.नंतर कोंडचे ग्रामदैवत भिमाशंकर महादेव मंदिरात दर्शन घेऊन.मांदिराच्या सभाग्रहात ग्रामस्थांशी सौ पाटिल यांनी संवाद साधून गावच्या विकासाबाबत कोंड गावाला झुकते माप दिल्याचे सांगीतले व भिमाशंकर मंदिराला क दर्जा मिळाल्यामुळे मार्च मध्ये दहा लाख रुपये निधी देणार आसल्याचे आर्चनाताई पाटिल यांनी जाहीर केले. यावेळी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी तायडे , कोंडच्या सरपंच सौ कविताताई सर्जे ,उपसरपंच रामेश्वर शेटे,कोंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाँ किशन लोमटे , डाँ फोलानी यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थीत होते , राष्ट्रवादिचे मास्टर माइंड अशी ओळख आसलेले माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुरव , शहादत मुलाणी , भाऊसाहेब नन्नुरे , अनुरथ भोसले , बाळू गिरी, जिल्हा परिषद सदस्या उषा यरकळ , पंचायत समिती सदस्य पद्मिनताई भोसले , ग्रामसेवक एल ई सुरवसे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते .

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।