राष्ट्रवादीच्या सोशल मिडिया तालुका कार्याध्यक्षपदी मन्नान औटी यांची निवड

173

उस्मानाबाद / प्रतिनिधी – राष्ट्रवादी सोशल मिडिया उमरगा तालुका कार्याध्यक्ष पदी गुंजोटी येथील मन्नान औटी यांची निवड यांची नुकतीच राष्ट्रवादिचे युवा नेते मल्हार पाटिल यांनी केली आहे.उमरगा येथील धडाडीचे राष्ट्रवादिचे कट्टर समर्थक युवा कार्यकरते मन्नान औटी हे सतत राष्ट्रवादी पार्टिसाठी धडपडत असतात . त्यांच्या कामाची दखल घेत काल ८/१/२०१९ रोजी उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी भवन येथे युवा नेते मल्हार पाटिल यांच्या उपस्थितीत मन्नान औटी यांना सोशल मिडियाच्या उमरगा तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र हि दिले आहे.त्यामुळे मन्नान औटी यांच्या खांद्यावर आता उमरग्याचा सोशल मिडियाचा भार पडणार आहे. औटी हे यापूर्वीही राष्ट्रवादिसाठी तळमळीने काम करतात त्यामुळे ही जबाबदारी मोठ्या उत्साहाने पार पाडतील .यावेळी राष्ट्रवादिचे शेकडो कार्यकरते उपस्थीत होते. या निवडीने पक्षाला मोठा फायदा तर होणारच आहे पण सोशल मिडियावर पक्षाची प्रसिद्धी होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या निवडीचे मन्नान औटी यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।