चांदुर बाजार तालुक्यात रेती तस्करी जोरात, वाढलेल्या दंडामुळे अधिकारी यांना दिले जाते प्रलोभन जिल्हा प्रशासन करणार का कार्यवाही? चांदुर बाजार:-बादल डकरे

0
1062
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार तालुक्यात रेती तस्करी जोरात,
वाढलेल्या दंडामुळे अधिकारी यांना दिले जाते प्रलोभन जिल्हा प्रशासन करणार का कार्यवाही?

चांदुर बाजार

चांदुर बाजार तालुक्यातील अनेक रेटिघाटवरून रेतीतस्करी राजरोसपणे केली जात आहे.याला जबाबदार कोण? कुठल्याही वरदहस्त शिवाय रेतीतस्करी शक्य नाही असे बोलले जात असले तरी तालुक्यातील एवढी प्रशासन व्यवस्था असताना चांदुर बाजार तालुक्यातील रेती ही मोर्शी आणि परतवाडा तालुक्यात कशी पोहचते? एवढेच नव्हे तर शासकीय कामावर चोरीची रेती वापरली जात आहे.
चांदुर बाजार तालुक्यातून रेती तस्करी होत असलेले ट्रक ,ट्रकटर दुसऱ्या तालुक्यात जातातच कसे?असा प्रश्न उपस्थित होत असून संगनमत शिवाय हे सर्व शक्य नाही.दंडाची रक्कम वाढल्यामुळे अधिकारी यांना प्रलोभन देऊन हा गोरखधंदा सर्रास सुरू आहे.
चांदुर बाजार तालुक्यातील नदी पात्रातील रेती ला अधिक जास्त मागणी असल्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उतखनन रेती घाट मधून होत आहे. याला जबाबदार कोण?
मागील काही महिन्यांपूर्वी पोलिस विभाग सुद्धा रेतीची ओहरलोड वाहतूक झाली असल्यास कार्यवाही करीत होती.त्यावेळेस रेती घाट लिलाव झाले होते.मात्र आता रेती घाटातून अवैध रेती तस्करी होत असताना सुद्धा पोलिस विभाग कार्यवाही का करीत नाही हा प्रश्न आहे?यापूर्वी गौंणखनिज म्हणून त्रास नव्हता .आता मात्र जेव्हापासून दंडाची रक्कम वाढली तेव्हापासून अधिक जास्त प्रमाणात पैसे खाण्याचा उपक्रम या माध्यमातून सुरू झाला आहे.दंडाची रक्कम कमी झाल्यास सर ट्रकचालक हा दंड भरेल.अधिकारी यांना कोठलेच प्रलोभन देणार नाही.परिणामी शासकीय खजाण्यात हा पैसा किमान जमा होईल.त्यामुळे तालुक्यातील होणाऱ्या रेती तस्करी वर आणि रेती तस्कर याच्यावर जिल्हा प्रशासन कार्यवाही करतील का हे पाहावे लागतील.

बॉक्स:-
“तालुक्यातील अनेक शासकीय कामावर चोरीची रेती वापरली जात आहे.तर दंडाची रक्कम वाढली असल्याने अधिकारी यांना प्रलोभन दिले जाते त्यामुळे अधिकारी होणाऱ्या रेती तस्करी वर दुर्लक्ष करतात. या सर्वांवर नव्याने जिल्हाअधिकारी ओमप्रकाश देशमुख काय कार्यवाही करणारे हे लक्षणीय ठरत आहे.”

प्रतिक्रिया:-
अवैध रेती तस्करी वर कार्यवाही साठी आमच्या तहसील चे चार पथक नेमण्यात आले आहे.अदलाबदल करून त्यांना कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले आहे.
विजय गोहाड निवासी नायब तहसीलदार चांदुर बाजार