कोंडमध्ये हातभट्टी दारुचा महापूर !

459

कोंडमध्ये हातभट्टी दारुचा महापूर !

उस्मानाबाद – उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथे सध्या दारुचा महापूर आला आहे.कोंड येथील मज्जीद परिसरात दारुचे दोन नविन दुकाने थाटले आहेत.भर चौकाच्या शेजारीच हे दोन दुकाने आसून दारुड्यांची चांगली सोय झाल्यामुळे दारु पिऊन भर चौकातच दारुड्यांना गोंधळ घालण्यासाठी सोईचे झाले आहे. कोंड येथे तीन शाळा आहेत हे दुकाने शाळेच्या हातभर अंतरावर आहेत.गावातील नागरीकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.शाळेत येणार्या विद्यार्थ्यांना दारुड्यांचा धिंगाणा ऐकावा लागत आहे .तसेच संपूर्ण गावातही दारुचे अड्डे खुलेआम सुरू आहेत .कोंड जवळील गावातील दारुडे हे या गावात येऊन दारु पिऊन गोंधळ घालतात. गावात पाण्याचा दुष्काळ आन् दारुचा सुकाळ आशी अवस्था झाली आहे. पाण्याची बाटली २० रुपयाला मिळते अन् हातभट्टीची बाटली १० रुपयाला मिळते.सध्या गावात मोठ्या प्रमाणात दारुची विक्री सुरु आहे.मज्जीद परीसरात तर दारुचा भालताच माहापूर आला आहे .या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी जाणार्या मुस्लिम बांधवांना या दारुड्यांचा सामना करत मज्जीदकडे जावे लागते . हि बाब अतिशय निंदनीय आहे.मज्जीद परिसरात होत आसलेल्या दारु विक्रीबाबत गावात मोठ्या प्रमाणात चर्चेचा सुर दिसत आहे. दारु पिऊन गावात दारुडे नागडे पडलेले असतात.शाळा, दवाखान्याच्या परिसरात दारुच्या बाटल्याही पडलेल्या असतात.अशा प्रकारावर कधी आळा बसेल असा सवाल विद्यार्थी वर्गातून उपस्थीत केला जात आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।