बीड येथे होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन सभेस ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हावे- गौतम साळवे

161

 

परळी वैजनाथ,

नितीन ढाकणे,दिपक गित्ते :- वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा दि.12 जानेवारी 2018 रोजी बीड येथील इजतेमा मैदान बिंदुसरा पात्र बीड येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या सभेला बीड जिल्ह्यातील व परळी तालुक्यातील बहुजन वंचित घटकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष गौतम साळवे व पदाधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दि.12 जानेवारी रोजी बीड येथील इज्तेमा मैदान, बिंदुसरा पात्र बार्शी नाका बीड येथे भारिप बहुजन महासंघ आणि एम आय एम यांच्यासह बहुजन वंचीत आघाडीच्या वतीने सत्ता संपादन निर्धार जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला संबोधित करण्यासाठी भारिपचे राष्ट्रिय नेते अँड. प्रकाश आंबेडकर आणि बॅरिस्टर असुदुद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच माजी आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार हरिभाऊ भदे, आमदार इम्तियाज जलील, माजी आमदार विजय मोरे, प्रदेश महासचिव अमित भुईगळ, सहसचिव सुरेश शेळके, विद्यार्थी आघाडीचे डॉ महेश भारतीय, प्रदेश निमंत्रक किसन चव्हाण आणि राजेश क्षिरसागर हे प्रमुख अतिथी आहेत. तरी या होणाऱ्या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष गौतम साळवे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।