डाँ बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तडवळकरांचे उपोषण

0
761
Google search engine
Google search engine

डाँ बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तडवळकरांचे उपोषण

हुकमत मुलाणी/ उस्मानाबाद

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तात्काळ उभा करून त्याचे काम पूर्ण करावे या मागणीसाठी उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील भीमसैनिक हे सध्या उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी कसबे तडवळे येथे 22 व 23 फेब्रुवारी 1941 रोजी भारतातील पहिली महार-मांग वतनदार परिषद घेतली होती. या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसबे तडवळे येथे आल्यावर जिल्हा परिषद मुलांची शाळा या ठिकाणी दोन दिवस मुक्कामी होते शासनाने या शाळेस स्मारक म्हणून घोषित केलेले असून सामाजिक न्याय विभाग समाज कल्याण महाराष्ट्र शासन यांनी 85 लाख 31 हजार 223 रुपये एवढी रक्कम सन 2016 रोजी मंजूर करण्यात आलेली आहे ही रक्कम ग्रंथालय व क्रांती स्तंभास मंजूर आहे. सदर रक्कम शासनाकडे 2016 पासून आजतागायत पडून आहे. परंतु अद्यापही स्मारकाचे काम चालू झालेले नाही त्यामुळे सदर काम त्वरित चालू करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांना दिनांक 17 /1 /2019 रोजी तत्काळ काम सुरू करा अन्यथा आम्ही उपोषण करणार असल्याची माहिती निवेदन देऊन तडवळे येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे कळवली होती. जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले होते निवेदनात प्रशासनास पंधरा दिवसात योग्य तो निर्णय घेऊन स्मारकाचे काम चालू करावे अशी विनंती करण्यात आली होती. परंतु शासनाने कोणताही निर्णय न घेतल्यामुळे व आंदोलकांना कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे आज सहा फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कसबे तडवळे येथील ग्रामस्थांनी एक दिवशी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे दिलेल्या निवेदनावर खालील भीमसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत संजय सोनवणे, सुशांत सोनवणे, विजय निकाळजे ,अजित निकाळजे, सुरेंद्र सोनवणे, दिग्विजय निकाळजे ,समाधान भालेराव, अजय निकाळजे, दत्ता निकाळजे ,सुहास सोनवणे ,पंकज गायकवाड ,उत्तम भालेराव ,तेजेस भालेराव, प्रशांत सोनवणे, अतुल सोनटक्के, सोनवणे प्रदीप, सोनवणे आशिष ,सुनील भालेराव, दत्ता निकाळजे, बळीराम भालेराव ,सोनवणे आकाश, दीपक सोनटक्के, विशाल शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद उस्मानाबाद समाजकल्याण विभाग उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष उस्मानाबाद पोलीस अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद पोलीस स्टेशन ढोकी ग्रामपंचायत कार्यालय कसबे तडवळे आनंद नगर पोलीस ठाणे उस्मानाबाद या ठिकाणी या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या होत्या परंतु अद्यापही आंदोलनकर्त्यांना कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीची माहिती न मिळाल्यामुळे सदर उपोषण करण्यात आल्याचे समजते