पबजी गेम मुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता – तरुणाई ला मोठ्या प्रमाणात लागली लत

337

चांदुर बाजार:/

सध्या मोबाइल डेटा अतिशय स्वस्तात उपलब्ध असल्याने गल्लोगल्ली मोबाइल आडवा धरून कानात हेडफोन घालून मुले, मुली आणि काही ज्येष्ठ मंडळीही हा गेम खेळताना नक्कीच दृष्टीस नक्कीच पडत आहे.त्यामुळे तरुणांना याचे अधिक वेड लागले असल्याचे दिसत आहे.
पबजी म्हणजेच ‘प्लेयर अननोन बॅटल ग्राउंड्स’ या मोबाइल गेमने सध्या तरुण पिढीला वेड लावले आहे. हा गेम अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध आहे. शिवाय त्याचे डेस्कटॉप व्हर्शनही उपलब्ध आहे. सध्या मोबाइल डेटा अतिशय स्वस्तात उपलब्ध असल्याने गल्लोगल्ली मोबाइल आडवा धरून कानात हेडफोन घालून मुले, मुली आणि काही ज्येष्ठ मंडळीही हा गेम खेळताना नक्कीच दृष्टीस पडतील.
‘पबजी’मध्ये तीन मुख्य जागा असून, त्याचे नकाशे आपल्याला दिसतात. त्यापैकी एक नकाशा निवडून आपण खेळायला सुरुवात करू शकतो. हे तीन नकाशे म्हणजे एक जंगल, एक वाळवंट आणि एक शहर आहे. हा गेम एकट्याने किंवा दोघांत किंवा चौघांतही खेळला जाऊ शकतो. आपण ज्या पद्धतीने खेळात जिंकत जातो, त्या नुसार गुण मिळतात. या गेम साठी आपण आपले फेसबुक अकाउंट वापरू शकतो.
पबजी हा गेम अतिशय उत्कंठावर्धक पद्धतीने तयार करण्यात आला आहे. उत्तमोत्तम ग्राफिक्स आणि आवाज हे या गेमचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. सर्वोत्तम ग्राफिक्स देण्याचा प्रयत्न या गेममध्ये करण्यात आला आहे. बारीक बारीक गोष्टीही अतिशय स्पष्टपणे दिसतील, अशी सोय करण्यात आली आहे. आवाज आणि इतर ध्वनीचा इतका प्रभावी वापर करण्यात आला आहे, की शत्रूच्या पावलांच्या आवाजावरून तो कोणत्या दिशेने आणि किती लांबून येत आहे, ते समजते. तसेच गाडीचा आवाज, पाण्याचा आणि इतर अनेक आवाजही या गेममध्ये स्पष्ट ऐकू येतात.
पबजी हा गेम खूप भुरळ पाडणार असाच आहे. आपल्या देशातील तरुण पिढीला या गेमचे जणू व्यसनच लागले आहे. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, अनेक नोकरदार वर्ग, फावल्या वेळात गेम खेळताना दिसत आहेत. काही मुले तर खाणे-पिणे विसरून तासनतास हा गेम खेळत बसतात. झोप विसरून रात्री दीड आणि दोन वाजेपर्यंतही गेम खेळला जात असल्याचे दिसून आले आहे. हा गेम खेळणाऱ्या अनेकांना मान आणि कंबरदुखीने त्रस्त झाले आहेत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।