ऊद्या झी टॉकीजवर हभप गणेश महाराज शेटे यांच्या किर्तनाचे प्रसारण

0
1286
Google search engine
Google search engine

आकोट/ता.प्रतिनीधी

आकोट तालुक्यातील योगयोगेश्वर संस्थान, वरुळ जऊळक्याचे अध्यक्ष ,समर्थ सदगुरू गजानन महाराजांचे भक्त ह. भ.प. गणेश महाराज शेटे यांचे.किर्तन झी टाँकीज चॕनलवर येत्या गुरुवार दि. १४ फेब्रुवारीला प्रसारीत होणार आहे.

हभप गणेश महाराज शेटे हे भागवताचार्य असुन महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्रा बाहेर जगन्नाथ पुरी,रामेश्वरम,काशी सह देशभरात विविध ठीकाणी त्यांची कथा,किर्तन तथा प्रवचन होत असतात.झी टॉकीज चॕनलवरील दररोज सकाळी ७.३० ते ८.३० वा. प्रसारीत होणाऱ्या गजर हरीकिर्तनाचा कार्यक्रमात त्यांच्या किर्तनाचे प्रसारण होणार आहे.

विशेष म्हणजे या कार्यक्रामाचे जगभरातील १७ पेक्षा जास्त देशात प्रक्षेपण होणार आहे.अशी माहीती शेटे महाराज यांनी प्रस्तुत प्रतीनिधीशी बोलतांना दिली.याआधी देखील झी टॉकीजवर शेटे महाराज यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे प्रसारण झाले आहे.त्या कार्यक्रमाला विदर्भासह संपुर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.त्याच्या या कार्यक्रमाला भरपुर टी आर पी मिळाल्याने व श्रोत्यांच्या मागणीमुळे येत्या 14 फेब्रृवारीला झी टाँकीजवर सकाळी 7-30 ते 8 -30 या वेळेत हभप शेटे महाराज यांच्या गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात त्यांचे कीर्तन प्रसारीत होईल.

या किर्तनाचा लाभ वह्राड विदर्भासह संपुर्ण महाराष्ट्रातील संत गजानन महाराजांच्या भक्तासह प्रेक्षकांनी घेण्याचे आवाहन हभप गणेश महाराज शेटे यांनी आमच्या प्रतीनिधीशी बोलतांना केले .