उस्मानाबादचे  राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांचा आदेश पाळणार का ?

268

उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे नेते शरद

पवारांचा आदेश पाळणार का ?

हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

उस्मानाबाद -राज्यासह देशात भाजपा व शिवसेनेची युती झाल्यानंतर लगेच राष्ट्रवादी कँग्रेसचे राष्ट्रीय आध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी राज्यातील अभद्र युती तोडण्याचे आदेश दिले माञ या अभद्र युतीतुन कँग्रेसचे फळे चाखनारी जिल्हा राष्ट्रवादी कँग्रेस हा आदेश पाळणार का ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे .
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी कँग्रेस हा बलाढ्य पक्ष .काही ठीकाणी भाजपा बरोबर तर काही ठिकाणी शिवसेनेसोबत युती करुन अनेक सत्तास्थाने काबीज केली आहेत . भाजपा सेनेच्या युतीची घोषणा होताच राष्ट्रवादी कँग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील भाजपा -सेनेबरोबरच्या युत्या तोडाण्याचे आदेश दिले .उस्मानाबाद जिल्ह्याचे मिनी मंञालय आसलेल्या जिल्हा परीषदेत भाजपा व राष्ट्रवादी ची युती आहे तसेच केवळ ऐक संचालक असतानाही जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद देऊन राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे .जिल्ह्यात राष्ट्रवादीचा प्रमुख विरोधक शिवसेना आसल्याचे त्यांच्या वर्तुणुकीवरून दिसुन येते तसेच जिल्ह्यतील लोकसभेसह चारही विधानसभा मतदार संघ युतीमध्ये सेनेच्या वाट्याला आलेल्या होत्या.एकंदरीत राष्ट्रवादीने नेहमीच भाजपाशी जवळीकतेचे संबंध ठेवलेले आहेत मात्र वरिष्ठ पातळीवर भाजपा सेनेची युती झाल्यानंतर आशा अभद्र युत्या तोडण्याचे राष्ट्रीय अध्यक्षांनी दिलेले आदेश जिल्हा राष्ट्रवादी पाळणार का हे पाहने महत्वाचे ठरणार आहे.जर हा आदेश पाळला तर जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयासह आनेक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे परंतू लोकसभेची आचारसंहिता जाहिर होण्यापूर्वीच हा आदेश स्थानिक पातळीवर पाळणे आवश्यक आहे नाही तर राष्ट्रीय अध्यक्षांचा हा आदेश देखील तात्पूरतीच वलगना ठरणार आहे .त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस या आदेशाचे पालन करून राजकीय भुकंप घडवणार का ? याकडे जिल्ह्याचे लागले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।