आला भूमिपूजन व उद्घाटनाचा महिना…. सावधान!

0
1093
Google search engine
Google search engine

समोर पाठ मागचे सपाट….!

शेगांव :- आगामी लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले तर विधानसभेची निवडणूक १ वर्षावर येऊन पोहोचली आहे यात सर्व पक्षांनी आप आपल्या कामाला सुरुवात केली आहे.

जे आमदार, खासदार, मंत्री मागील चार महिन्यांपासून दिसले नाही किंवा ‘आपल्या कडे खुप काम आहे’ असे म्हणून जनतेला वेळ न देणारे आता म्हणाल तेव्हढा वेळ देतात, त्यांचे म्हणणे ऐकतात मागील चार वर्षामध्ये जमा झालेली सर्व जनतेच्या तक्रार, अर्जाचा अचानक विचार केला जातो कारण,कारण एकच निवडणूक……

निवडणूक आली की शहरात, गावा-गावात उद्घाटनाचे रांगा लागतात मग परत तेच काम पुढील चार वर्ष कसे चालेल यावर भर देतात आणि मग आणखीन तेच निवडणूक तोंडावर आली की कसे बसे ते काम करतात व त्याचे उद्घाटन करतात गावातील दोन चौकात चार मोठं-मोठी होल्डींग(ब्यानर) लावून स्वतःचीच व्हावाही करून घेतात. असच काहीच विदारक चित्र शेगाव मघ्ये पहायला मिळते मागील दहा वर्षा पासून विकास आराखडा सुरू आहे त्यात आर डी १८ म्हणजे संत गजाननाचा पालखी मार्ग या मार्गासाठी जनतेनी किती तरी तक्रारारी आमदार, खासदार , मंत्री यांच्या कडे केल्या एवढेच नव्हे तर महाराष्ट्र सरकारने काढलेल्या ‘ आपले सरकार’ या अप्स वर देखील किती तरी तक्रारारी दाखल आहेत परंतु ते ही लोकप्रतिनिधी सारखेच असावे… जेव्हा मनात येईल तेव्हाच काम होईल यावर वाचा फोडण्याचा काम कितीतरी वृत्तपत्रांनी तसेच मीडियाने केली याची अनेक वेगवेगळ्या प्रकारे बातमी लावलीत परंतु काहीही फायदा नाही एवढे असून सुद्धा मतदारसंघाचे लाडके आमदार, खासदार यांनी ढुंकून सुद्धा पाहिले नाही परंतु आता निवडणूक तोंडा वर पाहता मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात जाऊन भेटीगाठी करणे, विचार पूस करणे, जनतेचे जे काम मागील तीन ते चार वर्षा पासून पडलेली आहेत ती कामे आता काही दिवसातच कशी होतात ? कारण भीती… तर कशाची तर आपली “खुर्ची” !
परंतु उद्घाटन करतांना मागील आपण केलेल्या उद्घाटनाचे काय झाले ? त्याचे काम पूर्ण झाले किंवा नाही ? नाही झाले तर का नाही झाले ? याची माहिती घेणे आपले काम न्हवे का? परंतु वेळ कुणाला आहे.
‘ मग या सरकार मध्ये व मागील सरकार मध्ये फरक तरी काय’