‘ड्युरेक्स’ या निरोध उत्पादन करणार्‍या आस्थापनाच्या विज्ञापनासाठी होळी सणाचा अश्‍लाघ्य वापर

0
1399
Google search engine
Google search engine

मुंबई – ‘ड्युरेक्स’ या निरोधाच्या विज्ञापनामध्ये होळी सणाचा वापर करून होळी सणाचा अवमान करण्यात आला आहे. विज्ञपनाच्या एका चित्रामध्ये एक अर्धनग्न युवक आणि एक अर्धनग्न युवती यांना दाखवण्यात आले असून त्या दोघांच्या हातात होळीमध्ये वापरण्यात येणारी बंदुकीसारखी पिचकारी आहे. यात लिहिले आहे की, ‘फ्युएल युअर गन स्टे वेट धिस होली !’ दुसर्‍या चित्रामध्ये ‘धिस होली बाय बलून्स दॅट डोन्ट बर्स्ट’ (असे ‘फुगे’ (निरोध) घ्या, जे फुटत नाहीत !), असे लिहिण्यात आले आहे. तसेच बाजूला होळीचे रंग दाखवण्यात आले आहेत.

धर्माभिमानी हिंदू पुढील संपर्कावर निषेध नोंदवत आहेत .

संपर्क क्रमांक : १८००-१०२-७२४५

इमेल : durex.india@rb.com

https://www.durexindia.com/

संयत मार्गाने निषेध करा !

निषेधामागचा मुख्य उद्देश वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्‍याला चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा दृष्टीकोन निषेधामागे हवा !