जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन

0
582
Google search engine
Google search engine



वाशिम-

 राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, एम. बी. डाखोरे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.