*अचलपुर मध्ये हर्ष उल्लासात साजरी झाली इदुल फित्र*

0
631
Google search engine
Google search engine
            अचलपुर  / श्री प्रमोद नैकेले/-


अचलपूर शहरात 26 जून सोमवार ला रमज़ान इद हर्षोल्लासात साजरी करण्यात आली.शहरामध्ये इद ची घोषणा रात्री उशिरा करण्यात आली. सकाळी 8.30 वाजता शहरए काज़ी व शहर  ए खतीब सै अबरार हुसेन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जामा मस्जिद येथून भव्य मिरवणुक निघाली 9.15  ला ईदगाह येथे पोहचली तेथे काज़ी साहेब यांनी महिलांच्या सुरक्षेबाबात व अत्यचार वर मार्गदर्शन करून धार्मिक व सामाजिक एकतेचा संदेश दिला.त्यानंतर खतीब ए शहर सै अबरार हुसेन साहेब यांनी इद ची नमाज़ करवून घेत ख़ुत्बा दिला इद च्या नमाज़ नंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. अचलपुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिना,  पोलीस स्टेशन चे थानेदार आधार सिंह सोनोने यांनी काज़ी साहेब, खतीब साहेब सहित सर्व मुस्लिम समाजाच्या बंधुभगीनींचे अभिनंदन करुन इदीच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी ईदगाह वर पत्रकार मो अज़हरुद्दीन, फ़िरोज़ खान,कॉंग्रेस शहर अध्यक्ष श्रीकांत झोड़पे,पूर्व अध्यक्ष प्रकाश सिंह तरवले,नरेंद्र फिसके, सै सईद अली व अन्य गणमान्य व्यक्तींनी उपस्थित राहून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.