अवैध देशी दारू विक्रेता गजाआड – शिरजगाव कसबा पोलिसांची कार्यवाही

0
735
Google search engine
Google search engine
बादल डकरे / चांदुर बाजार/-


फोटो :-आरोपी आणि जप्त केलेला माल आणि शिरजगाव कसबा पोलीस.

दिनांक 23 जून सायंकाळी 7 च्या सुमारास पोलिसांना गुप्त माहिती मिडाळी कि शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील खरपी या गावामध्ये राधेश्याम दशरथ सोनिया या आपल्या राहत्या घरून देशी दारूची विक्री करीत होता.शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन चे ठाणेदाद मुकुंद कवाडे यांनी त्याच्या घरी रेड केली असता त्यांना  22 देशी दारूच्या बॉटल या गाडीच्या डिकीत आढळून आल्या आणि त्याची तो विक्री करीत होता.ठाणेदार कवाडे सोनिया यांच्या घरातील कूलर व मो/सा क्र.MH/27/AL /3584 यामध्ये माल बाळगुन अवैध देशी दारु विक्री करतांना दिसून आल्याने दोन्ही ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी कडून खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे.              
       1)देशी दारूचे 22 बॉटल की 1600₹                 
                                   
2 )एक मो /सा. की. 40,000 ₹                                                 
  3 )एक कूलर कि. 5000  ₹                                                 
   4 )एक मोबाईल कि.3,000 ₹ असा एकूण 49,600/- ₹ चा ₹
आरोपी ला रात्रीच त्याच्या घरून अटक  करून आरोपीवर मु. दा.का. नुसार कारवाई शिरजगाव कसबा पोलीस करीत आहे.सदर  कार्यवाही ठाणेदार शिरजगाव कसबा मुकुंद कवाडे यांनी आणि शिरजगाव कसबा पोलीस टीम ने केली.