बाबांचा आदर्श घेऊन माझे व्यक्तिमत्व घडवते – मृणाल जाधव, बालकलाकार

0
786
Google search engine
Google search engine
माझे बाबा मुंबई पोलीस खात्यात असल्यामुळे, मला त्यांच्यासोबत जास्त वेळ व्यतीत करता येत नाही. पण जेव्हा ते फ्री असतात तेव्ह्या जास्तीतजास्त वेळ त्यांच्याबरोबर घालवणे मी पसंत करते. माझ्या बाबांबद्दल सांगायला गेले तर भरपूर काही आहे. खरं तर… अभिनयक्षेत्रात येण्याचे प्रोत्साहन मला बाबांकडूनच सर्वातआधी मिळाले. आमच्या घरात याआधी कोणीच या क्षेत्रात वळले देखील नव्हते. पण बाबांनी माझी आवड लक्षात घेत, यात काम करण्याची मुभा दिली. आईपेक्षा बाबांसोबत माझी जास्त बॉन्डीग आहे. त्यांच्याशी मी प्रत्येक गोष्ट शेअर करत असते, ते सतत माझ्यासोबत असावेत असे मला वाटते, कधी कधी तर ते वेळ देत नाही म्हणून मी त्यांच्यावर रागावते देखील. पण तो अबोला काही वेळापुरताच असतो. माझ्या आगामी ‘अंड्या चा फंडा’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये ते माझ्यासोबत असावेत असे मला वाटत होते, पण ते प्रत्येकवेळी शक्यच होईल असे नाही, याची जाणीव मला होती. बाबांशी बोलल्याखेरीज मला समाधान लाभत नाही. माझे बाबा मुंबई पोलिस खात्यात असल्याचा मला फार अभिमान असून त्यांच्या कामिगिरीचा आदर्श घेऊन मी माझं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न करते आहे.