वादळ व अवकाळी पावसामुळे तालुक्यात मोठे नुकसान धनोडी येथे घरांवरील छप्पर उडाले तहसिलदारांनी केली पाहनी

0
629
Google search engine
Google search engine


चांदुर रेल्वे :- (शहेजाद  खान)-


चांदुर रेल्वे तालुक्यातील धनोडी, सातेफळ फाटा  गावात गुरूवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे व जोरदार पावसाने गावातील दोन घरांवरील छप्पर उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. तसेच मोठी झाडे सुध्दा पडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.


     वादळासोबतच पावसानेदेखील सुमारे एक तास हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे धनोडी येथील गणेश राऊत व संतोष जवळकार यांच्या घरावरील टीनाचे छप्पर उडुन घरात साठवून ठेवलेले अन्नधान्य व इतर साहित्य ओले झाल्याची माहिती आहे. प्रचंड वेगात वादळ आल्याने सातेफळ फाटा येथील अतिशय जुने झाडे सुध्दा कोसळली आहे.

 या वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. यामुळे अनेक वेळापर्यंत विजेचा पुरवठा सुध्दा खंडीत झाला होता. तसेच या भागातील केबल ही मोठ्या प्रमाणात तुटले आहे. सुदैवाने यामध्ये जिवितहानी झाली नाही. सदर झालेल्या नुकसानीची तत्काळ पाहनी चांदूर रेल्वे तहसीलदार बी. राजगडकर, मंडळ अधिकारी लंगडे, पटवारी योगेश वंजारी, चिखलकर यांनी केली.